Posts

Showing posts from October, 2020

पुस्तक घडवते मस्तक

Image
लेखक प्रा. #विद्या_संतोष_होडे हडपसर विधानसभा समन्वयक vidyahode.blogspot.com एम ए एम एड, डीएसएम, बॅचलर इन जर्नालिझम You tube https://www.youtube.com/channel/UC-ivpBD8NUBpx5HDv3_v4eg डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिवस #वाचन_प्रेरणा_दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीमध्ये वाचाल तर वाचाल ही म्हण आहे.  वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयुष्यात प्रेरणा देणारे, चांगले विचार देणारे आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मूलमंत्र देणारे असे एक प्रेरणादायी पुस्तक वाचनात आले. #यशाचा_Password   --  प्रा. नितीन बानगुडे-पाटील. मुद्रा प्रकाशन सातारा. प्रथमावृत्ती २० नोव्हेंबर २०१७ द्वितीय आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१८ पृष्ठे २२८ मूल्य २५० /- ______________________________________________ साप्ताहिक चित्रलेखामध्ये 2013 ला तरुणांना मार्गदर्शन आणि यशप्राप्तीसाठी दिशा देण्यासाठी प्रा नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह *यशाचा पासवर्ड* या पुस्तकात करण्यात आले आहे.     यश मिळविण्यापेक्षा यशाचा मार्ग दाखविणे, सांगणे कठीण कर्म आ...

अटलजींची कविता आणि सकारात्मक दृष्टीकोण

Image
  अटलजींची कविता आणि सकारात्मक दृष्टीकोण                अटलजी हे प्रभावशाली वक्ता आणि भावनाशील कवी म्हणून आपल्याला परिचित आहेत. त्यांचे कवी मन त्यांच्या वाणीतून प्रसंगी कठोर आणि प्रसंगी हळवे झाले. त्यांच्या कवितेने जीवनाविषयक सकारात्मकता, कठीणातील कठीण प्रसंगाला ध्यैर्याने सामोरे जाण्याची जिद्द, प्रेम, मृत्यूची आढळताआणि जगण्याची ओढ अशा अनेक विषयांना हात घातला.               आयुष्यात अडचणी, संकटे येतच असतात पण सदैव चालत राहणे हा मनुष्यधर्म ते सांगतात.          " बाधाये आती है और आये            घिरे प्रलय कि घोर घटाये             पावो के नीचे अंगारे            सिर पर बरसे यदि ज्वालाये            निज हाथो मे हसते-हसते           आग लागाकर जलना  होगा            कदम मिलाकर चालना होगा I       ...

3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

Image
 🌹 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती : सावित्रीच्या लेकी असे म्हणून घेताना अभिमानाने मान ताठ होते. तसं पाहिलं तर भारत जगतात दोन सावित्री ने आपल्या कर्तुत्वाने जगासमोर आदर्श ठेवला. एक सत्यवानाची सावित्री आणि दुसरी ज्योतिबाची सावित्री. एकीने यमाकडून पतीचे प्राण परत आणले आणि दुसरीने पतीच्या साथीने जगातील स्त्रियांच्या जगण्यात प्राण ओतला. आजच्या स्त्रीचा विचार केला तर या दोन्ही सावित्रीचा मिलाप होणे फार गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार शालेय जीवनात महत्त्वपूर्ण दहा गाभा घटक शिकवले जातात त्यातील एक "स्त्री पुरुष समानता" आहे. आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या जमान्यामध्ये स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभे आहे स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा मागे नाही स्त्रीही कर्तुत्ववान कर्तबगार आहे हे सिद्ध केले मग असं असतानाही, स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढताना दिसते , स्त्री शिक्षणाबाबत आजही उदासीनता जाणवते,  मुलगी म्हणजे परक्याचे धन हे वयात आलेल्या प्रत्येक मुलीच्या आई बापाला वाटते , मुलगी म्हणजे काचेचं भांडं असं प्रत्येक तरुण मुलीच्या ...

हमारी राष्ट्रीय प्रतिज्ञा के लेखक थे कवि ‘पेदेमरी व्यंकट सुब्बाराव’

Image
 भारत एक बहुभाषी, बहुसांस्कृतिक देश है, लेकिन इस विविधता में भी एकता है। भारत की राष्ट्रीय प्रतिज्ञा, राष्ट्रगान, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय त्यौहार एकता की अभिव्यक्ति हैं।  हम सभी स्कूली जीवन से ही पाठ्यपुस्तक की शुरुआत में राष्ट्रीय प्रतिज्ञा कहते आ रहे हैं। भारत मेरा देश है। सभी भारतीय मेरे भाई हैं। मुझे अपने देश से प्यार है। यह प्रतिज्ञा हमारी पहचान और एकता का एक अभिन्न अंग है। हम राष्ट्रगान ‘वंदे मातरम्’ के लेखक और राष्ट्रगान ‘जन गण मन’ के लेखक रवींद्रनाथ टैगोर, बंकिमचंद्र चटर्जी के नामों से परिचित हैं। पाठ्यपुस्तकों में भी इन्हीं नामों का उल्लेख है, लेकिन हममें से अधिकांश को इस बात का कोई अंदाजा नहीं है कि हमारी राष्ट्रीय प्रतिज्ञा किसने लिखी और कब इसे पाठ्यपुस्तकों में शामिल  किया गया?  हमारी राष्ट्रीय प्रतिज्ञा से तर्कसंगत, समतावादी, एकीकृत समाज के निर्माण का आदर्श विचार रखा गया है। हम आने वाली पीढ़ियों के लिए इस अनमोल धरोहर को संरक्षित करना जारी रखेंगे। आओ जानते हैं इस प्रतिज्ञा लेखक के बारे में... यह प्रतिज्ञा 1962 में आंध्र प्रदेश के प्रसिद्ध तेलुगु लेखक पेद...

मातृदिन

 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 *प्रा. सौ #विद्या_संतोष_होडे   *आई......*             *जन पळभर म्हणतिल 'हाय हाय' मी जाता राहील कार्य काय....* या भा रा तांबे यांच्या ओळींनी मरणाची भीती कधीही मनाला शिवून न देणारी माझी आई.....          मी आहे तोपर्यंत काही काळजी करू नका आणि मेल्यानंतरही तुम्हाला काळजी करावी लागणार नाही असे आयुष्यभर सांगणारी माझी आई....         आई  तुला जाऊन एक वर्ष झाले पण हे वर्ष युगासमान वाटले गं.......  'आई मुलांसाठी काय करते' असे रागाने म्हणणारे आम्ही पण खरंच जाणवतं आई मुलांसाठी काय करते अन् किती करते हे तुझ्याकडे पाहून कळते. एक मराठीची शिक्षिका म्हणून तुझ्यातील हुशारी, अभ्यासूवृत्ती, चुणूक ही नेहमीच तू आयुष्य कसं जगावं? आर्थिक नियोजन कसं करावं? हे फार मोठं अवडंबर न माजवता लहान लहान म्हणी, शब्दप्रयोग यातून आम्हाला समजून सांगितले. *लंकेत सोन्याच्या विटा* *थेंबे थेंबे तळे साचे*          लहानपणी जेव्हा ७० टक्के पडले की तू म्हणायचीस बघ तुझ्या...

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?

 #लेख विषय: #तुझ्या_विना_जाऊ_शरण_कुणा_? लेखिका: #प्रा_विद्या_संतोष_होडे महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी #आषाढी__एकादशी  निमित्त अठ्ठावीस युगे कर कटावरी ठेवून उभ्या असणाऱ्या विठुरायाकडे विठूमाऊली कडे महाराष्ट्राच्या कल्याणाचे साकडे घातले. मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी लढवय्या सेनापतीच्या भूमिकेतून कोरोनारुपी संकटामध्ये महाराष्ट्राचे खंबीरपणे नेतृत्व केले आहे ते पाहता आज विठुरायाच्या दर्शनाने त्यांच्या मनी #भाग_गेला_शीण_गेला । #अवघा_झाला_आनंद  हे भाव आले असणार हे नक्कीच. #शुद्ध_बीजापोटी_फळे_रसाळ_गोमटी या प्रमाणे प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीचा, कार्यकर्तृत्वाचा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचा वारसा मा.उद्धव साहेब ठाकरे यांनी  आपल्या खंबीर, संयमी आणि शांत स्वभावाने सिद्ध करून दाखवला आहे. #आपण_चंदन_असल्याची_घोषणा_चंदनाला_करावी_लागत_नाही_त्याचा_वास_वाऱ्याबरोबर_आसमंतात_पसरत_असतो महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून  मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची, मुख्यमंत्...

कोरोना शाप की वरदान

 लेख  विषय: कोरोना शाप की वरदान  लेखिका: प्रा विद्या संतोष होडे शालेय जीवनापासून एक निबंध हमखास लिहायला असायचा *विज्ञान शाप की वरदान*  मग एका विषयाच्या दोन्ही बाजू मांडत असताना विज्ञान मानवाला वरदान कसे ठरले आहे आणि विज्ञानाचा मानवाने केलेला अतिरेक त्यालाच शाप कसा देत आहे या दोन्ही बाजू मांडल्या जायच्या.  काळाच्या ओघात विज्ञानामध्ये नवनवीन टप्पे येत गेले बदल घडत गेले आधुनिक तंत्रज्ञान आले आणि आजच्या या २०२० मध्ये ज्यावेळेस भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे, तरुणांचा देश म्हणून प्रगतीपथावर जात आहे त्याच वेळेस एक असा विषय समोर आला की ज्यांनी  मानवाच्या प्रगतीची, मानवाच्या उत्तुंग भरारीची, मानवाने विज्ञानाच्या साथीने निसर्गावर केलेल्या आक्रमणाची सर्व पंख छाटून टाकली आणि तो विषय या पुढील काळामध्ये निबंधाचा विषय ठरला नाही तर नवलच आहे. तो विषय आहे *कोरोना शाप की वरदान* *कोरोना शाप की वरदान* या विषयाचा विचार करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने डोळ्यासमोर येते ती म्हणजे कोविड १९ या अदृश्य अतिसूक्ष्म विषाणूने मानवाला घरांमध्ये बंदिस्त करून ठेवले आणि विशे...

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर...

 अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर...  आधी हाताले चटके मग मिळते भाकर........        या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळी  जीवनाचा खरा अर्थ सांगून जातात.     आज लॉकडाऊन स्पेशल मध्ये चुलीवर स्वयंपाक करताना मला सतत या ओळी आठवत होत्या.    आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कधीही न येऊ असा निवांतपणा लॉकडाऊन मुळे मिळाला. लहानपणी गावाकडे अनुभवलेली चुलीवरच्या जेवणाची चव खूप वर्षांनी अनुभवता आली.     चुलीवरचे गरमागरम जेवण म्हणजे नक्की काय?  तर संपूर्ण आयुष्याचा सार आहे.     चुलीमध्ये सतत लाकडे टाकून चूल पेटवावी लागते. सगळीच लाकडे मोठी घालून चालत नाही काही छोट्या-छोट्या काटक्या, पालापाचोळा, एखादे मोठा लाकूड अशी त्या सरपणा मध्ये विविधता असेल तरच चूल चांगली पेटते. आपल्या आयुष्यातही असंच आहे ना! नेहमीच स्वतःच खरे म्हणून कसं चालेल कधीतरी कमीपणा घ्यावा लागतो, कधी माघार घ्यावी लागते, तर कधी सरशी घेऊन पुढे व्हावंच लागत.       चुलीवर स्वयंपाक करताना भांड्याचं बूड हे नेहमी जाडच असावं लागतं.     तसंच आपल्...

मन करा रे प्रसन्न

Image
  लेख: मन करा रे प्रसन्न 10 ऑक्टोबर #जागतिक_मानसिक_आरोग्य_दिन   आरोग्य ही बहुआयामी संकल्पना आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. प्राचीन काळापासून *शरीर खलु धर्म साधनम्* *आरोग्यम् धनसंपदा* यांसारख्या सुभाषितांद्वारे आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. षडरिपूवर नियंत्रण प्राप्त झाले की सुखी जीवन जगता येते. केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे म्हणजे उत्तम आरोग्य नाही तर मानसिक दृष्ट्या संतुलित, नियंत्रित असणे याला आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. या * मना * ला अनुसरूनच मराठी भाषेमध्ये अनेक म्हणी आहेत.  *मन चिंती ते वैरी न चिंती* *मन मोकळे करणे*  *मनास लावून घेणे* *चोराच्या मनात चांदणे* *मनी वसे ते चित्ती दिसे* *मन भरून येणे* *मनात मांडे खाणे* *मनात घर करणे*      व्यक्तिमत्त्वाचा समतोल व एकात्म विकास साधणे, आपल्याजवळील समायोजनक्षमतेव्दारे जीवन अधिकाधिक कार्यक्षम करणे, मन निरोगी व विकसनशील ठेवणे या सर्व बाबी मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत. *Mental hygiene is a science and art of av...

आषाढी एकादशी

 महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी *आषाढी एकादशी* निमित्त अठ्ठावीस युगे कर कटावरी ठेवून उभ्या असणाऱ्या विठुरायाकडे विठूमाऊली कडे महाराष्ट्राच्या कल्याणाचे साकडे घातले. मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी लढवय्या सेनापतीच्या भूमिकेतून कोरोनारुपी संकटामध्ये महाराष्ट्राचे खंबीरपणे नेतृत्व केले आहे ते पाहता आज विठुरायाच्या दर्शनाने त्यांच्या मनी *भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद* हे भाव आले असणार हे नक्कीच. *शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी* या प्रमाणे प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीचा, कार्यकर्तृत्वाचा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचा वारसा मा.उद्धव साहेब ठाकरे यांनी  आपल्या खंबीर, संयमी आणि शांत स्वभावाने सिद्ध करून दाखवला आहे. *आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही त्याचा वास वाऱ्याबरोबर आसमंतात पसरत असतो* महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून  मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची, मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत असताना कोठेही आपल्या वाणी आणि विचारावरचा ताबा सुटू दिलेला ना...

विज्ञान शाप की वरदान

 शालेय जीवनापासून एक निबंध हमखास लिहायला असायचा *विज्ञान शाप की वरदान*  मग एका विषयाच्या दोन्ही बाजू मांडत असताना विज्ञान मानवाला वरदान कसे ठरले आहे आणि विज्ञानाचा मानवाने केलेला अतिरेक त्यालाच शाप कसा देत आहे या दोन्ही बाजू मांडल्या जायच्या.  काळाच्या ओघात विज्ञानामध्ये नवनवीन टप्पे येत गेले बदल घडत गेले आधुनिक तंत्रज्ञान आले आणि आजच्या या २०२० मध्ये ज्यावेळेस भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे, तरुणांचा देश म्हणून प्रगतीपथावर जात आहे त्याच वेळेस एक असा विषय समोर आला की ज्यांनी  मानवाच्या प्रगतीची, मानवाच्या उत्तुंग भरारीची, मानवाने विज्ञानाच्या साथीने निसर्गावर केलेल्या आक्रमणाची सर्व पंख छाटून टाकली आणि तो विषय या पुढील काळामध्ये निबंधाचा विषय ठरला नाही तर नवलच आहे. तो विषय आहे *कोरोना शाप की वरदान* *कोरोना शाप की वरदान* या विषयाचा विचार करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने डोळ्यासमोर येते ती म्हणजे कोविड १९ या अदृश्य अतिसूक्ष्म विषाणूने मानवाला घरांमध्ये बंदिस्त करून ठेवले आणि विशेष म्हणजे हा लॉकडाऊन फक्त या सृष्टी वरील *मनुष्यप्राण्या* साठीच होता. ...

कोरोना काळात बदललेले विवाहाचे स्वरूप

 *कोरोना काळात बदललेले विवाहाचे स्वरूप रूप पाहता* १)आपल्या भारतीय संस्कृती मध्ये विवाह हे केवळ दोन व्यक्तींचे होत नसतात तर तो एक आनंदाचा उत्साहाचा आणि नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट यांनी एकत्र येण्याचा चांगला योग असतो. त्यामुळे सामाजिक शिस्तीचे, आरोग्याचे भान पाळून सर्वांनी एकत्र येणे यासाठी विवाह हे एक उत्तम कारण आहे. २) *नवरा येतो नवरी साठी वऱ्हाडी येतात जेवणासाठी* त्यामुळे लग्नप्रसंगी होणारे अन्नदान हे आपल्या विवाह संस्कृती चे उत्तम उदाहरण आहे. परंतु केवळ अति श्रीमंतीचे स्टेटस विचार करून लग्नप्रसंगी चे विविध पदार्थ चे स्टॉल बुफे डिनर ठेवले जाते त्यामुळे अन्नाची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी होते कोणताच पदार्थ व्यवस्थित न खाता ताटामध्ये अनेक पदार्थ वाढून घेऊन ते वाया घालवले जातात. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीतील *पंगत* ही पद्धत आदर्श आहे आणि ती पुढील काळातही चालू रहावी असे मला वाटते. ३) लग्नपत्रिका छपाई मध्ये आलेली विविधता ही कलाकुसरीची बाब असली तरी त्यावर होणारा खर्च आणि पत्रिकावाटप या कालावधीमध्ये होणारी धावपळ, अपघात तसेच पत्रिका न मिळाल्यामुळे होणारी नाराजी आणि पर्यावरणाची हानी...

जागतिक कुटुंब दिन

नमस्कार🙏🙏🙏 आपणा सर्वांना *जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* शुभेच्छुक ::  सौ. प्रा. #विद्या_संतोष_होडे #vidya_santosh_hode ( हडपसर विधानसभा समन्वयक महिला आघाडी)       या वर्षीचा हा कुटुंब दिन खऱ्या अर्थाने *कौटुंबिक जिव्हाळा* घेऊन आलेला आहे. कारण लॉकडाऊन मुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आहेत. जग *लॉकडाउन* झालं असलं तरी लोक खऱ्या अर्थाने *कौटुंबिकअटॅच* झाली आहे.      कुटुंब म्हणजे  केवळ रक्ताची नाती नाही .... तुम्हाला  गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब.          आज या लॉकडाउनच्या काळामध्ये आर्थिक आधाराबरोबरच  मानसिक आणि भावनिक आधाराची नितांत गरज आहे. कारण कोरोनाच्या बातम्या ऐकत असताना वाढणारी संख्या आणि हृदयाचा चुकणार ठोका यामुळे नैराश्याचं उदासीनतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जीवनाच्या अनिश्चिततेने मनामध्ये भीतीचे सावट दाटलेले आहे. या अशा प्रसंगी दूर मैलोन मैलाचा प्रवास करून शहरांमध्ये कष्ट करणाऱ्या नोकरदार वर्गाने आपल्या गावाकडे आपल्या कुटुंबाकडे ओढ घेतलेली आहे. कौटुंबिक नात्यातील जिव्हाळा,...

भारतीय जैन संघटना महाविद्यालय

ही आवडते मज मनापासुनी शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा || या उक्तीप्रमाणे बालपणी जशी शाळा आवडत असते तसेच कुमार वयामध्ये आल्यानंतर आपली पाऊले नव्या आशा, आकांक्षा, उत्साह , उमेद घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेश करतात.        महाविद्यालयीन जीवन तुम्हाला तुमच्या पुढील व्यावसायिक, व्यावहारीक आणि सुजाण नागरिकत्वा साठी तयार करत असते. असे म्हणतात, इमारतीचा पाया भक्कम असेल तर इमारत मजबूती ने डौलाने उभी राहते. बालपण जर पाया असेल तर महाविद्यालयीन जीवन त्या इमारती वर चढणारा एक एक मजला आहे. इमारत किती भव्यदिव्य बनवायची हे त्या महाविद्यालय जीवनात मिळणाऱ्या अनुभवातून ठरत असते.     केवळ बौद्धिक ज्ञान मिळविणे हाच महाविद्यालय जीवनाचा उद्देश नसतो किंबहुना तो नसावा. म्हणूनच मी मला भाग्यशाली समजते कि, मी भारतीय जैन संघटना या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.      2002 ला  एस वाय बी ए  मराठी स्पेशल विषय निवडून मी महाविद्यालयात प्रवेश घेतला.  प्रा.आवटे सर यांचे मराठी विषयाचे व्याकरण, संत साहित्याचा अभ्यास, बालकवींचे काव्य, भाषाविज्ञान, साहित्य सिद्धांत आणि...

प्रा. विद्या संतोष होडे

 प्रा. विद्या संतोष होडे एम ए (मराठी, इतिहास, राज्यशास्त्र) एम.एड,(विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण) शालेय व्यवस्थापन पदविका, पत्रकारिता पदवी (प्रिंट मीडिया). आठ वर्ष डीएड अध्यापक विद्यालयात अध्यापनाचा अनुभव.   निवेदिका ,  वक्ता  , लेखिका. सडेतोड राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम पारितोषिक माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रदान. यशवंतराव चव्हाण  प्रतिष्ठान मुंबई पुरस्कृत गुणगौरव निबंध स्पर्धा प्रथम पारितोषिक. रोटरी क्लब ऑफ निगडी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक. शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघा तर्फे आदर्श वक्ता म्हणून पुरस्कार. पेट्रोलियम अनुसंधान संघ आयोजित सामान्य ज्ञान चाचणी प्रथम पारितोषिक. मधुमालती फाउंडेशन पुरस्कृत *हडपसर महिला भूषण* पुरस्कार. अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था जागतिक महिला दिनानिमित्त *स्त्री शक्ती सन्मान*. रोटरी क्लब ऑफ पुणे *आदर्श शिक्षिका* पुरस्कार. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सेमिनार मध्ये रिसर्च पेपर सादर. २०१७  शिवसेना महिला आघाडी पुणे शहर, शहर समन्वयक. २०१...

कोरोना योद्धा सन्मानपत्र

 *कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र मिळाले.................* नमस्कार,          आता तुम्ही म्हणाल हे सन्मानपत्र मिळाले त्यात इतका कसला आनंद.  आमच्याकडे तर अनेक सन्मानपत्र आली. खूप खूप दूर दूर पर्यंत कामाची दखल घेण्यात आली.  या सन्मानपत्रावर अनेक चर्चा तर्कवितर्क ही झाले. खरंच काम केले का की केलेच नाही?, केवळ सन्मान पत्र घेतले की तू मला आणि मी तुला दिले. ते जाऊ द्या काही का असेना...... योद्धा हा योद्धाच असतो मग तो कोरोनाशी युद्ध करो किंवा रोजच्या जगण्यासाठी युद्ध करो. त्या सर्वांनाच माझा सलाम🚩🚩🚩 या कोरोना च्या काळात प्रत्येकानेच आपापल्या परीने संघर्ष केला आणि जगण्याची एक नवीन दिशा शोधून जीवनाचे रहाटगाडगे काही काळ बाजूला ठेवत निवांतपणा अनुभवला आणि आता पुन्हा लॉकडाऊन संपल्यानंतर नव्याने स्वतःला सुरक्षित ठेवत दैनंदिन जीवन व्यवहाराला  ही लागला. आणि मग कोरोनाची भीती बाजूला सारून जेव्हा हा सामान्य माणूस योध्दाप्रमाणे त्या कोरोना वर स्वार झाला..... त्याच वेळी मलाही माझ्या वाढदिवशी हे सन्मानपत्र मिळाले आणि खूप आनंद झाला............ आपण केलेल्या * फूल ...

माझा मुलगा स्वराज याचे ऑनलाईन शाळेचे अनुभव

Image
 नमस्कार दोस्तांनो, आज आज मी माझे ऑनलाईन शाळेविषयी चे अनुभव सांगणार आहे. तसा विचार केला तर ही ऑनलाइन शाळा मला खूपच गमतीची वाटत आहे. मी आता दुसरी मध्ये गेलो आहे. म्हणून मग मी माझे अनुभव या स्पर्धेसाठी सांगावे असे मला आई म्हणाली. आई ने विचारलं तुला कशी वाटते रे ऑनलाइन शाळा तर मी एकदमच उत्तर दिले खूपच छान.......... का माहिती आहे का तुम्हाला?  मला ही शाळा खूप छान वाटते पहाटे उठून शाळेला जायची गडबड नाही, युनिफॉर्म नाही, दप्तराचे ओझे नाही... हो आता मित्रांना प्रत्यक्ष भेटणे जरा मिस करत असलो तरी त्यांच्याशी ऑनलाईन क्लास चालू असताना काय चाललंय कुठे आहेस कसा आहे अशी बडबड करता येते एक गंमत म्हणजे मी बडबड करत असताना मॅडम आम्हाला मारत नाहीत. आता तुम्ही म्हणताल अभ्यासाचं काय........? पण माझी आई आणि माझे बाबा दोघेही माझ्या अभ्यासावर, खेळण्यावर, चित्रकला, कागदापासून वस्तू बनवणे, हस्ताक्षर, वक्तृत्व कौशल्य यावर विशेष लक्ष देत असतात. शाळेतील मॅडम दिलेला अभ्यास सुंदर हस्ताक्षरात केवळ लिहून न पाठवता त्याचे व्यवस्थित आकलन करणे यावर भर देत असते. पाढे हे रमत-गमत हसत-खेळत म्हणून घेत असते. अभ्यास कर...

समाज सेवेचे समाधान

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आपण ज्या समाजाचा घटक असतो त्यामुळे आपल्या अस्तित्वाला एक ओळख निर्माण होते. त्यामुळे समाजासाठी फुल ना फुलाची पाकळी कार्य करता आले तर ते आपण समाजऋण फेडणे आहे. गरजू आणि मिळालेल्या सेवेद्वारे जीवन जगण्याची उभारी धरणार्‍या  व्यक्तीसाठी कार्य करणे मला फार महत्त्वाचे वाटते. समाजसेवा म्हणजे केवळ आर्थिक मदत असे न होता आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणे , त्यांच्याशी आपुलकीने बोलणे तसेच अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचं म्हणणे , त्याचं दुःख शांतपणे ऐकून घेणे आणि त्या दुःखाची वाच्यता इतर कोणाकडेही न करणे त्याच्याबद्दल सहानुभूती असण्यापेक्षा समानानुभूती असणे मला महत्त्वाचे वाटते. ही एक व्यक्ती म्हणून मला समाधान देणारी समाजसेवा आहे. परंतु एक राजकारणी व्यक्ती म्हणून समाजसेवा करत असताना मला आपल्या पक्षाची सामाजिक बांधिलकी त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे ही तितकेच महत्त्वाचे वाटते.  कारण राजकारणी व्यक्ती स्वार्थाशिवाय काही करत नाही असा जो गैरसमज सर्वांमध्ये परिस्थितीनुरूप निर्माण झालेला आहे त्याला मी अपवाद कशी असेल. त्यामुळे माझा शिवसेना पक्ष व त्य...

खऱ्या गौराया

 आजचा विषय * खऱ्या गौराया *  या २०२० वर्षा मध्ये कोरोना या विषाणूने जे थैमान घातले आहे आणि एकूणच सर्व धर्मीयांच्या सणावाराला जे साधेपणाचे, अलिप्ततेचे वळण लागले आहे ते पाहता आपल्या आजूबाजूलाच आनंद निर्माण करता येईल अशा अनेक गोष्टी यावर्षी आपल्याला नकळत कळून गेल्या. आता आलेला हा गौरी गणपतीचा सण. गौरी या दोन दिवसासाठी माहेरवाशीण म्हणून येतात आणि आपल्याला वर्षभरासाठी आनंदाची शिदोरी देऊन जातात.     तसेच एक स्त्री म्हणून माहेर आणि माहेरवाशिण यातील प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा बंध मैत्रीण, शेजारीण, कामवाली, विद्यार्थिनी यांच्यामध्ये निर्माण करणे आजची गरज आहे.      कुटुंबासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या महिला या खऱ्या गौराया आहे. कोरोना काळामध्ये कर्तव्य म्हणून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी या खऱ्या गौराया आहेत.       तसेच माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारणाची शिदोरी घेतलेल्या आपल्या सर्व महिला या ही खऱ्या गौराया आहेत. लेखिका    प्रा विद्या संतोष होडे हडपसर विधानसभा समन्वयक शिवसेना महि...

कोरोना काळ

 आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन, कोरोना संकट यांचा विचार करताना * नात्यातील माणुसकी * आणि * माणुसकीचे नातं * यांचं जतन करणं फार महत्त्वाचं वाटलं. कोरोना या महाभयंकर संकटामुळे भूतकाळात न मिळालेला आणि भविष्यकाळातही कधी न यावा असा लॉकडाऊन काळ आपल्या पिढीच्या वाट्याला आला. पण हा काळ अनुभवत असताना आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या अनेक जुन्या गोष्टी नव्याने जगता आल्या. * अन्न हे पूर्णब्रह्म * या उक्तीप्रमाणे घरचे गरमागरम अन्न पोट भरून जेवणे यासारखा आनंद नाही.  * सहकुटुंब सहपरिवार * जगण्याचा आनंद आणि * घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती * अशा आपल्या घरामध्ये आपल्या परिवाराबरोबर एकत्र जेवण्याचा आनंद आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये सुद्धा वर्णन केलेला आहे. निरोगी आरोग्याचे रहस्य यामध्ये दडलेलं आहे.      टेन्शन, काळजी, अस्थिरता, आर्थिक विवंचना यामुळे निर्माण झालेल्या मानसिक अस्वास्थ्यावरील उपाय या काळामध्ये * कमीत-कमी गरजांमध्ये उत्तम जीवन जगता येते * यातून अनुभवाला आला. * अन्नदान श्रेष्ठदान * हा प्राचीन ग्रंथातील उपदेश भुकेल्या जीवाला पोटभर अन्न देऊन त्याच्या चेहऱ्य...

भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा

Image
 भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असा विविधतेने नटलेला देश आहे. परंतु या * विविधतेत एकता * आहे. भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय सण यामधून एकात्मतेचे दर्शन घडत असते. शालेय जीवनापासूनच पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच असलेली राष्ट्रीय प्रतिज्ञा आपण सर्वजण म्हणत आलेलो आहोत. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे" . ही प्रतिज्ञा आपल्या सर्वांच्या अस्मितेचा आणि एकात्मतेचा अविभाज्य भाग आहे.   'वंदे मातरम' या राष्ट्रगानाचे लेखक बंकिमचंद्र चटर्जी व 'जनगणमन' या राष्ट्रगीतांचे लेखक रवींद्रनाथ टागोर यांची नावे आपल्याला परिचित आहेत. तसा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकांमध्ये केलेला आहे. परंतु आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली आणि तिचा पाठ्यपुस्तकांमध्ये कधी समावेश करण्यात आला याबाबत आपल्या बऱ्याच जणांना काहीच माहिती नाही. आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेतून विवेकवादी, समतावादी, एकात्म समाज घडविण्याचा आदर्श विचार मांडलेला आहे. या अमूल्य वारशाचे जतन भविष्यातील पिढ्यांसाठी आपण करणारच आहोत. यासाठी या प्रतिज्ञा लेखकाचा ह...

महात्मा गांधी आणि शिक्षणाचा कार्यवादी दृष्टीकोण

Image
  गांधीजींचे जीवन व कार्य यांचा परिचय नसलेली व्यक्ती अपवादभूतच !                    गांधीजी हे केवळ राजकीय पुढारीच नव्हते .धर्म, समाजकारण, अर्थकारण, हरिजनोद्धार, साहित्य, कला, ब्रह्मचर्य ,  निसर्गोपचार अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात सखोल चिंतन व प्रत्यक्ष प्रयोग करून त्यांनी त्या क्षेत्रातील समस्यांवर प्रकाश टाकला. मौलिक व अभिनव विचारसंपदा प्रकट केली. शिक्षणाचे क्षेत्र अर्थातच त्यातून वगळले गेले नाही. त्यांनी शिक्षणासंबंधी केवळ विचारमंथनच केले असे नव्हे तर संपूर्ण शिक्षण योजना देशाला सादर केली. एक थोर शिक्षणतज्ञ म्हणून महात्मा गांधीजींचा परिचय व्हावा हा या लेखनामागील उद्देश... महात्मा गांधीजींच्या मते  केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे.   आत्मा व मन यांचा परिपूर्ण विकास करून व्यक्ती मधील सर्वोत्कृष्ट गुणांची अभिव्यक्ती करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय   3H - Head, Heart and Hand   बुद्धी, भावना आणि हात यांचा संगम म्हणजेच शिक्षण ही संकल्पना गांधीजींनी मांडली. महात्मा गांधीजींनी सर्वांगीण विकासात अध्यात्मिक विक...