तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?
#लेख
विषय: #तुझ्या_विना_जाऊ_शरण_कुणा_?
लेखिका: #प्रा_विद्या_संतोष_होडे
महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी #आषाढी__एकादशी निमित्त अठ्ठावीस युगे कर कटावरी ठेवून उभ्या असणाऱ्या विठुरायाकडे विठूमाऊली कडे महाराष्ट्राच्या कल्याणाचे साकडे घातले.
मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी लढवय्या सेनापतीच्या भूमिकेतून कोरोनारुपी संकटामध्ये महाराष्ट्राचे खंबीरपणे नेतृत्व केले आहे ते पाहता आज विठुरायाच्या दर्शनाने त्यांच्या मनी
#भाग_गेला_शीण_गेला । #अवघा_झाला_आनंद हे भाव आले असणार हे नक्कीच.
#शुद्ध_बीजापोटी_फळे_रसाळ_गोमटी या प्रमाणे प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीचा, कार्यकर्तृत्वाचा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचा वारसा मा.उद्धव साहेब ठाकरे यांनी आपल्या खंबीर, संयमी आणि शांत स्वभावाने सिद्ध करून दाखवला आहे.
#आपण_चंदन_असल्याची_घोषणा_चंदनाला_करावी_लागत_नाही_त्याचा_वास_वाऱ्याबरोबर_आसमंतात_पसरत_असतो
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची, मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत असताना कोठेही आपल्या वाणी आणि विचारावरचा ताबा सुटू दिलेला नाही.
संत तुकाराम महाराजांच्या भाषेतच म्हणायचे तर,
#घासावा_शब्द। #तासावा_शब्द। #तोलावा_शब्द_बोलण्यापूर्वी
#ठेवावे_भान। #देश_काळ_पात्राचे।#बोलावे_बरे| #बोलावे_खरे
माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी #संकट_गंभीर_सरकार_खंबीर म्हणत खऱ्या अर्थाने या संकटाला खंबीरपणे तोंड देत महाराष्ट्रातील जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. म्हणूनच #बोले_तैसा_चाले_त्याची_वंदावी_पावले असे म्हणावेसे वाटते.
पंढरीचा विठ्ठल, पांडुरंग हा सर्वांची माऊली आहे. माऊलीच्या मायेने हा संतांचा, वारकर्यांचा मेळा जपला आहे. तसेच मा. मुख्यमंत्री #उद्धवसाहेब_ठाकरे यांनी कोरोना संकट काळामध्ये कधी प्रेमळ, कधी थोडे रागावून, कधी मायेने समजावून घेत, तर मायेने समज देत जबाबदार कुटुंबवत्सल, प्रेमळ कुटुंब प्रमुखाची भूमिका घेतली आणि त्याच मायेने या महाराष्ट्राला कुशीत घेऊन पंढरीच्या विठुराया कडे #तुझी_कृपादृष्टी_आम्हावर_राहू_दे हे साकडे घालत आहेत.
लॉकडाऊन मध्ये जरी प्रार्थनास्थळे बंद असली आणि वर्षानुवर्ष अविरतपणे चालू असलेली वारी परंपरा या संकटामुळे खंडित झाली असली तरीही पंढरीच्या विठुरायाचे रूप आपल्याला कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या प्रत्येक समाजसेवकामध्ये दिसून आले.
म्हणूनच त्या विठुराया कडे एकच मागणे आहे
#हेचि_दान_देगा_देवा_तुझा_विसर_न_व्हावा_गुण_गाईन_आवडी_हेचि_माझी_सर्व_जोडी
आज ज्या लालपरीने पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले त्या लालपरी बसचे चालक मुस्लिम समाजाचे आहेत. अठरा पगड जातींना एकत्र घेऊन भागवतधर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन #सर्वधर्मसमभावा चा संदेश वारकरी संप्रदायाने आणि संत शिकवणुकी ने महाराष्ट्राला दिला आहे. याच सर्वधर्मसमभावाचे दर्शन आजही आपल्याला होताना दिसते.
#विष्णुमय_जग_वैष्णवांचा_धर्म|#भेदाभेद_भ्रम_अमंगल|
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या #हे_विश्वची_माझे_घर याप्रमाणे संपूर्ण जगावर पसरलेले हे कोरोनारुपी संकट लवकर दूर होऊन मनुष्य कल्याणाचे कार्य सर्वांच्या हातून घडावे हीच त्या विठुरायाच्या चरणी विनम्र प्रार्थना🙏🙏
#आले_अस्मानी_संकट_वेठीस_राहिली_धरा । #घ्यावे_नाम_माऊलीचे_विठू_विश्वास_आसरा
#विद्या_संतोष_होडे
#vidya_santosh_hode
#सावी_बहुउद्देशीय_सामाजिक_संस्था
Comments
Post a Comment