माझा मुलगा स्वराज याचे ऑनलाईन शाळेचे अनुभव
नमस्कार दोस्तांनो,
आज आज मी माझे ऑनलाईन शाळेविषयी चे अनुभव सांगणार आहे.
तसा विचार केला तर ही ऑनलाइन शाळा मला खूपच गमतीची वाटत आहे. मी आता दुसरी मध्ये गेलो आहे. म्हणून मग मी माझे अनुभव या स्पर्धेसाठी सांगावे असे मला आई म्हणाली.
आई ने विचारलं तुला कशी वाटते रे ऑनलाइन शाळा तर मी एकदमच उत्तर दिले खूपच छान..........
का माहिती आहे का तुम्हाला?
मला ही शाळा खूप छान वाटते पहाटे उठून शाळेला जायची गडबड नाही, युनिफॉर्म नाही, दप्तराचे ओझे नाही... हो आता मित्रांना प्रत्यक्ष भेटणे जरा मिस करत असलो तरी त्यांच्याशी ऑनलाईन क्लास चालू असताना काय चाललंय कुठे आहेस कसा आहे अशी बडबड करता येते एक गंमत म्हणजे मी बडबड करत असताना मॅडम आम्हाला मारत नाहीत.
आता तुम्ही म्हणताल अभ्यासाचं काय........?
पण माझी आई आणि माझे बाबा दोघेही माझ्या अभ्यासावर, खेळण्यावर, चित्रकला, कागदापासून वस्तू बनवणे, हस्ताक्षर, वक्तृत्व कौशल्य यावर विशेष लक्ष देत असतात.
शाळेतील मॅडम दिलेला अभ्यास सुंदर हस्ताक्षरात केवळ लिहून न पाठवता त्याचे व्यवस्थित आकलन करणे यावर भर देत असते. पाढे हे रमत-गमत हसत-खेळत म्हणून घेत असते. अभ्यास करताना एखादी स्पेलिंग पाठ नसेल तर फाईव्ह टाइम्स लिहून ते पाठ करायला लावते. केवळ शाळेत दिलेला होमवर्क पटपट लिहून पाठवणे एवढ्यापुरतीच तिने माझी शाळा मर्यादित ठेवली नाही. घरामध्ये आणलेला भाजीपाला फ्रिजमध्ये भरून ठेवत असताना आई भेंडी, टोमॅटो, वांगी अशा भाज्या मोजायला लावते तसेच त्यांचा रंग ओळखायला सांगते.हिरव्या रंगाच्या भाज्या असल्या तरी त्यातील प्रत्येकाचा हिरवा रंग किती वेगळा आहे. प्रत्येक टोमॅटोचा लाल रंग किती वेगवेगळ्या छटा आहेत , हे आई समजून सांगत असते. तिलाही सध्या लाॅकडाऊन मुळे निवांतपणा असल्यामुळे ती नवीन नवीन युक्ती शोधून आमचा अभ्यास घेत असते अनेक ऑनलाईन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावला आहे. तानाजी मालुसरे यांची कथा सादर करून मी कथाकथन स्पर्धेत भाग घेतला.
माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही ट्रेकिंगलाही गेलो. पावसाळी वातावरणात भिजत असताना आईने आईने बालकवी यांची *श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे* या कवितेचा सुंदर असा अर्थ समजावून सांगितला. श्रावण महिन्यामध्ये कसा मध्येच पाऊस पडतो पाऊसाची सर आली घेऊन पडते आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसत असते सर्व सगळीकडे हिरवळ उगवलेली असते हिरवेगार वातावरण असते याचा अर्थ तिने मला प्रत्यक्ष निसर्गात गेल्यावर समजावून सांगितला.
मराठी महिने आणि त्यामध्ये बदलत जाणारे ऋतुमान याविषयी आईने मला अगदी सोपे शब्दांमध्ये अर्थ सांगितला.
बागेमध्ये झाडांना पाणी घालणे, पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल मध्ये रोपे लावणे, फणस, आंबा यांच्या बिया मातीमध्ये टाकून त्याच्यातून अंकुर फुटतात, रोपे कशी वाढतात याचं निरीक्षण करायला मला पप्पांनी शिकवले. अशा पद्धतीने माझी आई आणि पप्पा दोघेही मला शिकवत असतात. आता मी हे सगळे अनुभव सांगत आहे तुम्ही म्हणाल किती हुशार मुलगा आहे!!! पण कधी कधी मला ही कंटाळा येतो येणारच ......मी ही लहानच आहे की!!!!
मग मला माझी आई थोडीशी मदत करते पण ती मदत घेत असताना तिची एक अट असते तू न कंटाळता अभ्यास करणार असेल तरच मी मदत करणार. खूप लिखाण काम असेल तर ती मला एक दोन वाक्य लिहून ही देते तसे शाळेतल्या बाई लिहून देत नाही म्हणून मी माझ्या आईवर खुश असतो.
खेळताना जेवताना जसा आपल्याला कंटाळा येत नाही तसाच अभ्यास करतानाही आपण आनंदाने तो करायला घेतला की आपला अभ्यास लवकर होतो आणि नेहमी आपल्या लक्षात राहतो हे ती मला सांगत असते.
सतत हात धुणे हाताला सॅनिटायझर लावणे या गोष्टीही आता माझ्या अंगवळणी पडल्या आहेत. मीदेखील मोबाईलवर गेम खेळत असतो पण त्यासाठी मला आईने केवळ अर्धा तासच वेळ दिलेला आहे. त्या अर्ध्या तासात मी कोणते खेळ खेळतो ? यावर माझी आई आवर्जून लक्ष देत असते.
चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय. या लॉकडाउनच्या काळामध्ये मी अनेक चित्रे काढली, क्रेयॉन, पेन्सिल कलर यामुळे या चित्रांमध्ये वेगवेगळ्या शेडस् मला रंगविता आल्या. कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनवायला ही मी शिकलो अशीही माझी ऑनलाइन शाळा. तसं पाहिलं तर ती दिवसभर आईच्या शिस्तीत चालू असते. शाळेतील मॅडमच्या ठरलेल्या अर्ध्या एक तासाचा गुगल मीटिंग अटेंड केली कि आईकडे माझ्या या शाळेची सूत्रे आपल्या हाती घेते.
आईने मला एक व्हाट्सअप वरील मेसेज वाचून दाखवला आहे त्यात एक शाळकरी मुलगा म्हणतो कधी शाळा सुरू होतात आई पेक्षा शाळेतील बाई बऱ्याआहेत.

Comments
Post a Comment