पुस्तक घडवते मस्तक



लेखक

प्रा. #विद्या_संतोष_होडे

हडपसर विधानसभा समन्वयक

vidyahode.blogspot.com

एम ए एम एड, डीएसएम, बॅचलर इन जर्नालिझम

You tube

https://www.youtube.com/channel/UC-ivpBD8NUBpx5HDv3_v4eg


डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिवस #वाचन_प्रेरणा_दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीमध्ये वाचाल तर वाचाल ही म्हण आहे.

 वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयुष्यात प्रेरणा देणारे, चांगले विचार देणारे आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मूलमंत्र देणारे असे एक प्रेरणादायी पुस्तक वाचनात आले.


#यशाचा_Password   --  प्रा. नितीन बानगुडे-पाटील. मुद्रा प्रकाशन सातारा. प्रथमावृत्ती २० नोव्हेंबर २०१७ द्वितीय आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१८ पृष्ठे २२८ मूल्य २५० /-

______________________________________________


साप्ताहिक चित्रलेखामध्ये 2013 ला तरुणांना मार्गदर्शन आणि यशप्राप्तीसाठी दिशा देण्यासाठी प्रा नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह *यशाचा पासवर्ड* या पुस्तकात करण्यात आले आहे.

    यश मिळविण्यापेक्षा यशाचा मार्ग दाखविणे, सांगणे कठीण कर्म आहे ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी सहजपणे, सोप्या शब्दात *यशाचा पासवर्ड* या पुस्तकामध्ये सांगितले आहे. या पुस्तकामध्ये एकूण ११० यशाचे मार्ग, पासवर्ड सांगितले आहे.

        यशासाठी प्रत्येक जण धडपडत असतो पण बऱ्याचदा मार्ग सापडत नाही. मार्ग सापडला तरी त्यावर असणार्‍या अडचणीचा सामना कसा करावा हे कळत नाही. ते कळाले तर सामना करण्यासाठी सामर्थ्य कसे निर्माण होते हे समजत नाही. सामर्थ्य आले तरी त्याचा वापर कसा करावा हे उमजत नाही हे उमजले तरी निर्णय घेता येत नाहीत. यादृष्टीने यशाच्या मार्गातील हे अडथळे दूर करण्यासाठी  हे पुस्तक महत्वपूर्ण आहे.

      माणसाचं जगणं संतुलित हवं. जगण्यासाठी जरूर कमवावं पण त्यासोबत आपल्यालाच काय इतरांनाही निखळ, निरागस आनंद देणाऱ्या फुलासारखं फुलले तरच जगणं सुंदर होतं. यासारखे विचार या सध्याच्या नकारात्मक अवस्थेमध्ये जीवनामध्ये नवचैतन्य आणणारे आहे.

पुस्तक घेण्याची परिस्थिती नसलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिस्थितीवर मात करून चालते-बोलते ज्ञानपीठ झाले. ही प्रेरणा आजच्या मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या विद्यार्थ्यांना संकटांवर मात करून जो विजय प्राप्त करतो त्याच्यात गळ्यामध्ये यशाची माळ घातली जाते हे सांगून परावृत्त करणारी आहे.

        यशस्वी होण्यासाठी आढळनिश्चय, मनोबल, आत्मप्रेरणा, स्वओळख, आपल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर यासारखे अनेक यशस्वी होण्याचे मार्ग या पुस्तकांमध्ये सांगितले आहे.

        आल्फ्रेडनोबेल, नेपोलियन, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर पुरुषांच्या जीवनातील संदर्भ, दाखले देत त्यांनी मिळवलेली यशाची उंची, समाजपरिवर्तनाची धडपड यातून आजच्या तरुणाईला प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?