खऱ्या गौराया
आजचा विषय
*खऱ्या गौराया*
या २०२० वर्षा मध्ये कोरोना या विषाणूने जे थैमान घातले आहे आणि एकूणच सर्व धर्मीयांच्या सणावाराला जे साधेपणाचे, अलिप्ततेचे वळण लागले आहे ते पाहता आपल्या आजूबाजूलाच आनंद निर्माण करता येईल अशा अनेक गोष्टी यावर्षी आपल्याला नकळत कळून गेल्या.
आता आलेला हा गौरी गणपतीचा सण. गौरी या दोन दिवसासाठी माहेरवाशीण म्हणून येतात आणि आपल्याला वर्षभरासाठी आनंदाची शिदोरी देऊन जातात.
तसेच एक स्त्री म्हणून माहेर आणि माहेरवाशिण यातील प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा बंध मैत्रीण, शेजारीण, कामवाली, विद्यार्थिनी यांच्यामध्ये निर्माण करणे आजची गरज आहे.
कुटुंबासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या महिला या खऱ्या गौराया आहे. कोरोना काळामध्ये कर्तव्य म्हणून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी या खऱ्या गौराया आहेत.
तसेच माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारणाची शिदोरी घेतलेल्या आपल्या सर्व महिला या ही खऱ्या गौराया आहेत.
लेखिका
प्रा विद्या संतोष होडे
हडपसर विधानसभा समन्वयक शिवसेना महिला आघाडी
एम ए एम एड. डी एस एम. बी जे (प्रिंट मीडिया)
संस्थापक अध्यक्षा: सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था
Comments
Post a Comment