3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती
🌹 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती :
सावित्रीच्या लेकी असे म्हणून घेताना अभिमानाने मान ताठ होते.
तसं पाहिलं तर भारत जगतात दोन सावित्री ने आपल्या कर्तुत्वाने जगासमोर आदर्श ठेवला.
एक सत्यवानाची सावित्री आणि दुसरी ज्योतिबाची सावित्री.
एकीने यमाकडून पतीचे प्राण परत आणले आणि दुसरीने पतीच्या साथीने जगातील स्त्रियांच्या जगण्यात प्राण ओतला.
आजच्या स्त्रीचा विचार केला तर या दोन्ही सावित्रीचा मिलाप होणे फार गरजेचे आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार शालेय जीवनात महत्त्वपूर्ण दहा गाभा घटक शिकवले जातात त्यातील एक "स्त्री पुरुष समानता" आहे.
आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या जमान्यामध्ये स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभे आहे स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा मागे नाही स्त्रीही कर्तुत्ववान कर्तबगार आहे हे सिद्ध केले मग असं असतानाही, स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढताना दिसते , स्त्री शिक्षणाबाबत आजही उदासीनता जाणवते, मुलगी म्हणजे परक्याचे धन हे वयात आलेल्या प्रत्येक मुलीच्या आई बापाला वाटते , मुलगी म्हणजे काचेचं भांडं असं प्रत्येक तरुण मुलीच्या आई-वडिलांना वाटते हे असे का होते ??
ज्याचे उत्तर समाज मानसिकतेमध्येच जाणवते.व्यक्ती ही समाजाचाच एक भाग असल्यामुळे त्या समाजाचा प्रभाव व्यक्तीवर पडतोच समाजा व्यतिरिक्त व्यक्ती जगू शकत नाही तसेच समाजाचे आचार विचार संस्कार रूढी-परंपरा या ही व्यक्तीच्या विचारांना प्रभावित करत असतात. एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही स्त्रीकडे कोणत्या नजरेतून पाहता? हे फार महत्त्वाचे आहे, पाखराला उंच आकाशात उडण्यासाठी पंखाची गरज असते पण या दोन पंखा पैकी केवळ एक पंख बळकट असून उपयोग नसतो तर दोन्ही पंखांमध्ये सशक्तपणा असेल तर उंच आकाशात त्याला भरारी घेता येते.
दुर्गाबाई देशमुख यांनी म्हटलं आहे निम्म्या लोकसंख्येत असलेल्या स्त्रियांच्या शिक्षणावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
पण शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान , करिअरच्या शोधात स्वतःला हरविणे नाही. तर स्वतःच्या अस्तित्वाचा शोध, स्वतःबरोबरच कुटुंब आणि समाज विकासासाठी धडपड, स्वतःचा आत्मसन्मान जपणे आणि आत्मविश्वासाने येणारा प्रत्येक क्षण जगणे ही सर्व जीवन कौशल्य शिक्षणा तून विकसित व्हावी हीच त्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंची आपल्या स्त्री वर्गाकडून अपेक्षा असेल.
शिक्षणाद्वारे स्त्रीला आत्म सन्मान प्राप्त करून देणाऱ्या आणि आणि समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन!!!!
प्रा. विद्या संतोष होडे
(शिवसेना विधानसभा समन्वयक हडपसर महिला आघाडी पुणे)

Comments
Post a Comment