अटलजींची कविता आणि सकारात्मक दृष्टीकोण
अटलजींची कविता आणि सकारात्मक दृष्टीकोण
अटलजी हे प्रभावशाली वक्ता आणि भावनाशील कवी म्हणून आपल्याला परिचित आहेत. त्यांचे कवी मन त्यांच्या वाणीतून प्रसंगी कठोर आणि प्रसंगी हळवे झाले. त्यांच्या कवितेने जीवनाविषयक सकारात्मकता, कठीणातील कठीण प्रसंगाला ध्यैर्याने सामोरे जाण्याची जिद्द, प्रेम, मृत्यूची आढळताआणि जगण्याची ओढ अशा अनेक विषयांना हात घातला.
आयुष्यात अडचणी, संकटे येतच असतात पण सदैव चालत राहणे हा मनुष्यधर्म ते सांगतात.
" बाधाये आती है और आये
घिरे प्रलय कि घोर घटाये
पावो के नीचे अंगारे
सिर पर बरसे यदि ज्वालाये
निज हाथो मे हसते-हसते
आग लागाकर जलना होगा
कदम मिलाकर चालना होगा I
आपल्या समविचारी लोकांना जसे त्यांनी बरोबर घेतले तसेच इतर सर्वांनाही त्यांनी कधी अंतर दिले नाही त्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये त्यांच्या विषयी आत्मीयता आणि आदराची भावना होती. केवळ राजकीय मतभेद न करता मनभेद मिटवण्यासाठी ते कार्यरत राहिले. "आपले मित्र आपण बदलू शकतो पण शेजारी कसे बदलणार इतिहास बदलू शकतो पण भूगोल कसा बदलणार" या विचारांनी तर त्यांनी आयुष्यभर भारत-पाक मैत्रीपूर्ण संबंधासाठी प्रयत्न केले.
इन्सान बनो केवल नाम से नही,
रूप से नही, शक्ल से नही,
हृदय से, बुद्धी से, सरकार से, ज्ञान से
हा त्यांचा विचार "मनुष्य" म्हणून या जीवनातील आपली नीतिकर्तव्यच सांगतो. माणसातील माणुसकी समानानूभुती या मुल्यांना प्रतिष्ठा देतो.
भारतीय परंपरेतील सत्य, शिव, सुंदर या मूल्यांचे जीवनातील महत्व ते स्पष्ट करतात. राज्यघटना, राज्यकर्ते, शासन यांनी सत्यासाठी जागरूक असले पाहिजे हे सांगताना ते वस्तुस्थितीचीही जाणीव करून देतात,
" सच सबसे बडा हाथियार है और हर कोई जानता है
कि सरकारी जगहो पर हाथियार लेकर नही जा सकते I
राजकारण आणि समाजकारणातील कटुता अनेकदा समोर आल्यानंतरही त्यांच्यातील कर्तव्यनिष्ठ नेत्यांनी कधी हार मनाली नाही.
क्या हार मे क्या जीत मे
किंचित नही भयभीत मै
कर्तव्य पथ पर जो भी मिला
यह भी सही वो भी सही
वरदान नही मागुंगा
हो कूच पर हार नही मानूंगा!
सत्ता स्थापना आणि अल्पावधीतच सत्तेवरून पायउतार होताना त्याच्यातील कवी निराश झाला नाही .
हार नही मानूंगा रार नही ठानुगा
काल के कपाल पर लिखता मिटाता हू
गीत नया गाता हू I
असे ते म्हणतात
लोकशाही ही भारत वर्षाची महान परंपरा कधीही खंडित होणार नाही हा दृढ आत्मनिश्चय त्यांनी आयुष्यभर आचरणात आणला. सत्ता आणि पदासाठी हीन दर्जाचे राजकारण न करता लोकशाही गणतंत्राचा नेहमीच सन्मान केला.
सत्ता का खेल तो चलेगा
सरकारे आयेगी जायेगी
पार्टीया बनेगी बिगडेगी
मगर ये देश रहना चाहिये
इसका लोकतंत्र अमर रहना चाहिये I
हे अटलजींचे विचार आजच्या राजकारणाला, राज्यकर्त्यांना दिशा देणारे आहे.
देश एक मंदिर हें हम पुजारी हें
राष्ट्रदेव कि पूजा में हमे
समर्पित कर देना चाहिये I
या अटलजींच्या काव्यपंक्ती प्रत्येक देशवासियाने आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे हेच त्यांचे खरे पुण्यस्मरण ठरेल.
लेखन
प्रा. विद्या संतोष होडे
शिवसेना विधानसभा समन्वयक हडपसर महिला आघाडी पुणे


Comments
Post a Comment