कोरोना योद्धा सन्मानपत्र
*कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र मिळाले.................*
नमस्कार,
आता तुम्ही म्हणाल हे सन्मानपत्र मिळाले त्यात इतका कसला आनंद.
आमच्याकडे तर अनेक सन्मानपत्र आली. खूप खूप दूर दूर पर्यंत कामाची दखल घेण्यात आली.
या सन्मानपत्रावर अनेक चर्चा तर्कवितर्क ही झाले.
खरंच काम केले का की केलेच नाही?, केवळ सन्मान पत्र घेतले की तू मला आणि मी तुला दिले. ते जाऊ द्या काही का असेना......
योद्धा हा योद्धाच असतो मग तो कोरोनाशी युद्ध करो किंवा रोजच्या जगण्यासाठी युद्ध करो. त्या सर्वांनाच माझा सलाम🚩🚩🚩
या कोरोना च्या काळात प्रत्येकानेच आपापल्या परीने संघर्ष केला आणि जगण्याची एक नवीन दिशा शोधून जीवनाचे रहाटगाडगे काही काळ बाजूला ठेवत निवांतपणा अनुभवला आणि आता पुन्हा लॉकडाऊन संपल्यानंतर नव्याने स्वतःला सुरक्षित ठेवत दैनंदिन जीवन व्यवहाराला ही लागला.
आणि मग कोरोनाची भीती बाजूला सारून जेव्हा हा सामान्य माणूस योध्दाप्रमाणे त्या कोरोना वर स्वार झाला..... त्याच वेळी मलाही माझ्या वाढदिवशी हे सन्मानपत्र मिळाले आणि खूप आनंद झाला............ आपण केलेल्या *फूल ना फुलाची पाकळी* या कार्याची दखल घेतली याचा आनंद काही वेगळाच.
*५०० मास्कस चे वाटप*
*अन्नधान्य किटचे वाटप*
*रक्तदान शिबिराचे आयोजन*
*डॉक्टर आपल्या दारी या शिबिराच्या आयोजनाव्दारे नागरिकांची आरोग्य तपासणी*
*आर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गोळ्यांचे वाटप*
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहे कोरोना या आजाराविषयी भीती न बाळगता एक शिवसैनिक म्हणून *मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे* यांच्या आदेशानुसार माणुसकीच्या नात्याने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील व्यक्तींशी जपलेले आणि नेहमी जपत असलेले *माणुसकीचे नाते*
या कार्यात मला सहकार्य केलेल्या सर्वांची मी आभारी आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे सन्मानपत्र मिळाले आहे.
लेखिका
प्रा विद्या संतोष होडे
हडपसर विधानसभा समन्वयक शिवसेना महिला आघाडी
एम ए एम एड. डी एस एम. बी जे (प्रिंट मीडिया)
संस्थापक अध्यक्षा: सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था
Comments
Post a Comment