जागतिक कुटुंब दिन
नमस्कार🙏🙏🙏
आपणा सर्वांना *जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
शुभेच्छुक :: सौ. प्रा. #विद्या_संतोष_होडे
#vidya_santosh_hode
( हडपसर विधानसभा समन्वयक महिला आघाडी)
या वर्षीचा हा कुटुंब दिन खऱ्या अर्थाने *कौटुंबिक जिव्हाळा* घेऊन आलेला आहे. कारण लॉकडाऊन मुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आहेत. जग *लॉकडाउन* झालं असलं तरी लोक खऱ्या अर्थाने *कौटुंबिकअटॅच* झाली आहे.
कुटुंब म्हणजे केवळ रक्ताची नाती नाही .... तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब.
आज या लॉकडाउनच्या काळामध्ये आर्थिक आधाराबरोबरच मानसिक आणि भावनिक आधाराची नितांत गरज आहे. कारण कोरोनाच्या बातम्या ऐकत असताना वाढणारी संख्या आणि हृदयाचा चुकणार ठोका यामुळे नैराश्याचं उदासीनतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जीवनाच्या अनिश्चिततेने मनामध्ये भीतीचे सावट दाटलेले आहे. या अशा प्रसंगी दूर मैलोन मैलाचा प्रवास करून शहरांमध्ये कष्ट करणाऱ्या नोकरदार वर्गाने आपल्या गावाकडे आपल्या कुटुंबाकडे ओढ घेतलेली आहे. कौटुंबिक नात्यातील जिव्हाळा, प्रेम एकमेकांना आधार देण्याची, एकमेकांचे सुख दुःख वाटून घेण्याची आणि मनामधील मोकळेपणाने बोलण्याची सवयच माणसाला या विषाणूरुपी संकटावर विजय मिळवून देणारी आहे.
ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानात *हे विश्वचि माझे घर* असे म्हणून संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी, समृद्धीसाठी ईश्वराकडे पसायदान मागितले.
आपल्या संतांची ही शिकवण आपल्याला या परिस्थितीवर मात करण्याची शक्ती देणार आहे.
लॉकडाऊन चा काळ जसजसा वाढत आहे तसे या संकटाचे गांभीर्य आणि हे संकट सरल्यानंतर येणारे आर्थिक मंदीचे नवे संकट आपल्यापुढे आ वासून उभे आहे याची जाणीव आता संपूर्ण जगाला होऊ लागली आहे. अशा प्रसंगी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन केलेले व्यवसाय , एकमेकांना केलेले आर्थिक सहकार्य, महिला वर्गाने केलेले आर्थिक नियोजन, वाढत्या अपेक्षांचे ओझे कुटुंब प्रमुखावर न टाकता या परिस्थितीमध्ये त्यांची आर्थिक बाजू समजावून घेणे यासाठी कौटुंबिक आधाराची नितांत गरज आहे.
*सगळी सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही* या उक्तीप्रमाणे आर्थिक दुर्बलता आल्याने मानसिक आणि भावनिकदृष्ट्या ही माणसाचे खच्चीकरण होते. या लॉकडाउनच्या काळामध्ये बदलणाऱ्या कौटुंबिक भूमिकेचे किस्से जरी व्हाट्सअप वर आपण हसण्यावारी घेत असलो तरी पुढील काळामध्ये आपल्याला कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या भूमिका समजावून घेणे गरजेचे होणार आहे. *सहानुभूती पेक्षा सहअनुभूती* हे जीवन कौशल्य आपल्याला आत्मसात करावे लागणार आहे.
कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढणाऱ्या घटनांची संख्या चिंताजनक असली तरीही या परिस्थितीमध्ये कुटुंबातील सदस्यांनीच मानसिकशांतता, सहकार्य, ध्यान धारणा, योगासने याद्वारे आपला राग, चिडचिड, अतिरेकी मनस्ताप,स्वतःचे खरे करण्याची वृत्ती या गोष्टी नियंत्रणात आणल्या तर अशक्य असे काहीच नाही.
शेवटी संतांच्या भाषेत *अशक्य ते शक्य करतील स्वामी*
कुटुंबातील लहान मुले ही या काळामध्ये खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहेत कारण एका जागी शांत न बसणाऱ्या याच मुलांनी दोन महिन्याचा काळ घरामध्ये बंदिस्त होऊन काढलेला आहे. त्यामुळे त्यांच्या बालमनाचा विचार करता त्यांना घरातील छोट्या छोट्या कामांमध्ये सामावून घेणे, त्यांना गप्पागोष्टी गाणी ऐकविणे, बैठे खेळ खेळणे, मनोरंजनातून अभ्यास याद्वारे *मोबाईलसॅव्ही* होण्यापासून त्यांना आपल्याला सुरक्षित ठेवता येणार आहे. जे बालपण आपण अनुभवले ते त्यांना देण्याचा आपण प्रयत्न करूया.
पुन्हा एकदा आपणा सर्वांना जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
Comments
Post a Comment