मातृदिन

 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹


*प्रा. सौ #विद्या_संतोष_होडे  


*आई......*

      

     *जन पळभर म्हणतिल 'हाय हाय' मी जाता राहील कार्य काय....*

या भा रा तांबे यांच्या ओळींनी मरणाची भीती कधीही मनाला शिवून न देणारी माझी आई.....

         मी आहे तोपर्यंत काही काळजी करू नका आणि मेल्यानंतरही तुम्हाला काळजी करावी लागणार नाही असे आयुष्यभर सांगणारी माझी आई....

        आई  तुला जाऊन एक वर्ष झाले पण हे वर्ष युगासमान वाटले गं.......

 'आई मुलांसाठी काय करते' असे रागाने म्हणणारे आम्ही पण खरंच जाणवतं आई मुलांसाठी काय करते अन् किती करते हे तुझ्याकडे पाहून कळते.

एक मराठीची शिक्षिका म्हणून तुझ्यातील हुशारी, अभ्यासूवृत्ती, चुणूक ही नेहमीच तू आयुष्य कसं जगावं? आर्थिक नियोजन कसं करावं? हे फार मोठं अवडंबर न माजवता लहान लहान म्हणी, शब्दप्रयोग यातून आम्हाला समजून सांगितले.

*लंकेत सोन्याच्या विटा* *थेंबे थेंबे तळे साचे* 

        लहानपणी जेव्हा ७० टक्के पडले की तू म्हणायचीस बघ तुझ्या मैत्रिणीला ७५ टक्के पडले तेव्हा मी नेहमीच मला ७० टक्के पडले ना! म्हणून तुझ्याशी भांडायची...

तेव्हा तूच म्हणायचीस अगं राणी दुसऱ्याला तर ४० टक्के पडले मग तू तेवढे पाडती का?

आई तुझा हाच स्वभाव आज *उत्कृष्टतेचा ध्यास* घेताना मला ही मार्गदर्शक ठरतो.

         माझ्यातील वक्तृत्वाला, कथाकथनाला तुझ्या मराठी भाषेच्या ज्ञानामुळेच धार मिळाली. तू माझा  *विश्वकोश* होती.

आजारपणातील तुझा रेकॉर्ड केलेला शेवटचा व्हिडिओ पाहिला की तू आयुष्य ज्या सकारात्मकतेने जगली

*आपण चांगलं तर जग चांगलं* ती ऊर्जा आम्हालाही आयुष्य जगण्याची प्रेरणा देते.

" आई म्हणजे काहीच नाही

आई म्हणजे नुसतीच घाई

ज्याच्याजवळ नसते आई

त्याच्याजवळ काहीच नाही "

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?