कोरोना काळ
आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन, कोरोना संकट यांचा विचार करताना *नात्यातील माणुसकी* आणि *माणुसकीचे नातं* यांचं जतन करणं फार महत्त्वाचं वाटलं.
कोरोना या महाभयंकर संकटामुळे भूतकाळात न मिळालेला आणि भविष्यकाळातही कधी न यावा असा लॉकडाऊन काळ आपल्या पिढीच्या वाट्याला आला. पण हा काळ अनुभवत असताना आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या अनेक जुन्या गोष्टी नव्याने जगता आल्या.
*अन्न हे पूर्णब्रह्म* या उक्तीप्रमाणे
घरचे गरमागरम अन्न पोट भरून जेवणे यासारखा आनंद नाही. *सहकुटुंब सहपरिवार* जगण्याचा आनंद आणि *घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती* अशा आपल्या घरामध्ये आपल्या परिवाराबरोबर एकत्र जेवण्याचा आनंद आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये सुद्धा वर्णन केलेला आहे. निरोगी आरोग्याचे रहस्य यामध्ये दडलेलं आहे.
टेन्शन, काळजी, अस्थिरता, आर्थिक विवंचना यामुळे निर्माण झालेल्या मानसिक अस्वास्थ्यावरील उपाय या काळामध्ये *कमीत-कमी गरजांमध्ये उत्तम जीवन जगता येते* यातून अनुभवाला आला.
*अन्नदान श्रेष्ठदान* हा प्राचीन ग्रंथातील उपदेश भुकेल्या जीवाला पोटभर अन्न देऊन त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अनुभवता आला.
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभीच कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने घातलेले थैमान निधड्या छातीने, विश्वासाने, धीराने आणि जनतेच्या साथीने पेलणारा *मुख्यमंत्री* महाराष्ट्राला मिळाला हे देशालाच नव्हे तर जगाला दाखवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच *रयतेचे राज्य* आणि *रयतेचा राजा* हे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख मा.उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात घडवून आणले. त्यामुळे या कोरोनाच्या संकट काळामध्ये शिवसेनेची पदाधिकारी *शिवसैनिक* म्हणून लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, दृढ विश्वास निर्माण झाला याचा मला अभिमान आहे.🚩🚩🚩🚩🚩
लेखिका
प्रा विद्या संतोष होडे
हडपसर विधानसभा समन्वयक शिवसेना महिला आघाडी
एम ए एम एड. डी एस एम. बी जे (प्रिंट मीडिया)
संस्थापक अध्यक्षा: सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था
Comments
Post a Comment