समाज सेवेचे समाधान

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आपण ज्या समाजाचा घटक असतो त्यामुळे आपल्या अस्तित्वाला एक ओळख निर्माण होते. त्यामुळे समाजासाठी फुल ना फुलाची पाकळी कार्य करता आले तर ते आपण समाजऋण फेडणे आहे.

गरजू आणि मिळालेल्या सेवेद्वारे जीवन जगण्याची उभारी धरणार्‍या  व्यक्तीसाठी कार्य करणे मला फार महत्त्वाचे वाटते. समाजसेवा म्हणजे केवळ आर्थिक मदत असे न होता आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणे , त्यांच्याशी आपुलकीने बोलणे तसेच अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचं म्हणणे , त्याचं दुःख शांतपणे ऐकून घेणे आणि त्या दुःखाची वाच्यता इतर कोणाकडेही न करणे त्याच्याबद्दल सहानुभूती असण्यापेक्षा समानानुभूती असणे मला महत्त्वाचे वाटते. ही एक व्यक्ती म्हणून मला समाधान देणारी समाजसेवा आहे.

परंतु एक राजकारणी व्यक्ती म्हणून समाजसेवा करत असताना मला आपल्या पक्षाची सामाजिक बांधिलकी त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे ही तितकेच महत्त्वाचे वाटते. 

कारण राजकारणी व्यक्ती स्वार्थाशिवाय काही करत नाही असा जो गैरसमज सर्वांमध्ये परिस्थितीनुरूप निर्माण झालेला आहे त्याला मी अपवाद कशी असेल. त्यामुळे माझा शिवसेना पक्ष व त्या पक्षाची एक जबाबदार पदाधिकारी म्हणून समाजाने माझ्याकडून अपेक्षा ठेवणे गैर नाही पण याच समाजसेवेचे मोल ज्यावेळेस मताच्या रुपाने देण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्या पक्षाला भरघोस मतांनी विजय प्राप्त व्हावा हा स्वार्थ माझ्या समाजसेवे मागे असेल तर मला त्यात काहीही गैर वाटत नाही.

 आता प्रश्न येतो तो केलेल्या या समाजसेवेच्या समाधानाचा??

 या समाजाच्या मतरुपी आशीर्वादानेच हे समाधान प्राप्त होणार असते.

लेखिका  
प्रा विद्या संतोष होडे
हडपसर विधानसभा समन्वयक शिवसेना महिला आघाडी 
एम ए एम एड. डी एस एम. बी जे (प्रिंट मीडिया)
संस्थापक अध्यक्षा: सावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था 

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?