Posts

सावी

 भातुकली खेळण्यात तासान तास रममान होणारी पप्पा मला बार्बी सेट आणा म्हणून हट्ट करणारी माझी चिमुकली आज चक्क मला माझ्या खऱ्याखुऱ्या  संसारात मदतीस आली आणि म्हणाली आई आज मी एक चपाती लाटते मला खूप छान चपाती लाटता येते.  स्वयंपाकाच्या आवरावरील नेहमीप्रमाणेच राहू दे ग मी करते दम भरूनही  सावी च्या हटापुढे नाईलाज झाला आणि मग माझ्या खऱ्याखुऱ्या पोळपाट लाटण्यावर तिने एक चपाती लाटली.

मी आणि मेकअप !!!!!

 मी आणि मेकअप !!!!! दूरदर्शन वरळी येथील मेकअप स्टुडिओमध्ये मोठ्या आरशासमोर बसून मेकअप करत असताना अनेक आठवणी तरळून गेल्या. मेकअपचा आणि माझा तसा फार दूर दूर चा संबंध...….   शाळेतील शेतकरी नृत्य, दांडिया तसेच बीएड कॉलेज मधील तुला शिकवीन चांगलाच धडा हे सादरीकरण याप्रसंगी मेकअप केला. ती त्या व्यासपीठाची गरज होती.  पण तसा दैनंदिन जीवनात मी फारसा काही मेकअप करत नाही. त्यामुळे वरळी दूरदर्शनच्या मेकअप स्टुडिओमध्ये जिथे अनेक कलाकार, थोर व्यक्ती यांचा मेकअप होताना आपण टीव्ही मध्ये पाहत असतो, त्या ठिकाणी मेकअप आर्टिस्ट चेहऱ्याला मेकअप करत होते. त्यांने मला फार आनंद झाला.  यावेळी आई असती तर ती खूपच खुश झाली असती. कारण तिच्याप्रमाणेच मी ही नेहमी केसांची वेणी, टापटीप साडी अशा साधी राहणी पोशाखात वावरणारी .  पण आज स्टुडिओत सादरीकरणासाठी मेकअप करणे गरजेचे होते. यावर माझ्या सासूबाईंची प्रतिक्रिया  विद्या तू खूप छान दिसत होतीस!!!! या वाक्याने मी खूप भरून पावले.

करील मनोरंजन जो मुलांचे!! जडेल नाते प्रभूशी तयाचे!!

 करील मनोरंजन जो मुलांचे!! जडेल नाते प्रभूशी तयाचे!!         काल महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली.  शालेय व्यवस्थापन समितीची स्थानिक शिक्षण तज्ञ व एक पालक म्हणून या शाळेशी जोडले गेल्याचा अभिमान वाटतो.       मागे सोशल मीडियावर  शाळेतील विद्यार्थिनींने एका हिंदी गाण्यावर नृत्य  केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. आणि खरंच शाळेमध्ये गॅदरिंग असावे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला होता.  पण काल या शाळेच्या गॅदरिंगला गेले असता छत्रपती शिवाजी महाराज, साने गुरुजी, भारतीय सैन्य, पंढरीची वारी, पोलीस बांधव , आई-वडिलांबद्दल आदर, स्त्री शिक्षण, समाजसुधारकांचे कार्य, क्रांतिकारकांचे कार्य, पर्यावरण संवर्धन  या विविध विषयांवर नृत्य सादरीकरण करून समाजप्रबोधनाचा आदर्श घालण्याचे काम शाळा आणि विद्यार्थी या दोघांकडून होत असल्याचे लक्षात आले.  त्यांच्या कलागुणांना कौशल्य विकासाला वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन सहल सहशालेय...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 पुराणातील सत्यवानाचा प्राण वाचवणारी सावित्री आणि शिक्षणाची ज्योती घराघरांमध्ये पोहोचवणारी ज्ञानज्योती जोतिबाची सावित्री या दोघींनी महिलांना संस्कार आणि शिक्षणाचा आदर्श घालून दिला.  डोईवरचा पदर आणि कपाळावरची चिरा संस्काराबरोबरच पतीच्या शैक्षणिक सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणा-या सावित्रीबाईंनी प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचे द्वार खुले करून दिले.  या विषयावरच आधारित एक कविता तुझी सावित्री अन् माझी सावित्री सखे आपण दोघीही  सावित्रीला आईच मानतो ...... पण फारच वेगळी आहे  तुझी सावित्री अन् माझी सावित्री  तुझी सावित्री म्हणे .... स्वर्गापर्यंत धावली पतीच्या प्राणासाठी  माझ्या सावित्रीने धरतीवरच स्वर्ग उभा केला स्त्री शिक्षणासाठी ....... तुझी सावित्री पूजापाठ, आचार विचार  अन् सात जन्माची महती सांगणारी...... माझी सावित्री सन्मानासाठी दगड धोंडे आणि शेणाचा मारा अंगावर झेलणारी........ तुझी सावित्री धर्मग्रंथात अन् भाकड कथात रमणारी.... माझी सावित्री अंधश्रद्धा, रूढी परंपराना छेद देऊन समाजाशी लढ...

Know your Army Mela 2025

 सदैव सैनिका पुढेच जायचे! सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे नभात सैनिका प्रभात येऊ दे खगासवे जगा सुखात गाऊ दे फुलाफुलावरी सैनिका सुवर्ण शोभू दे जगास शांतता सुहास्य लाभू दे    न पाय तोवरी तुझे ठरायचे  सदैव सैनिका पुढेच जायचे    वसंत बापट यांची ही कविता सैनिकाचे जीवन व ध्येय किती खडतर आहे यावर भाष्य करणारी आहे.  आज know Your Army Mela या प्रदर्शनास भेट देत असताना सातत्याने या कवितेच्या ओळी मनामध्ये रेंगाळत होत्या.  एखाद्या नृत्याच्या निमित्ताने मिलिटरी चा ड्रेस परिधान करणे ही उत्सुकता आपल्यालाही लहानपणी होती,  तीच उत्सुकता आजच्या मुलांमध्येही आहे.  आपण सुखी आनंदी सुरक्षित जीवन जगतो त्याला कारण सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करण्यासाठी हे सैनिक सज्ज असतात. मुलांबरोबर हे प्रदर्शन पाहत असताना त्यांनीही मोठ्या उत्सुकतेने प्रदर्शनात ठेवलेल्या अत्याधुनिक शस्त्रांची तंत्रांची माहिती घेतली.

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जयंती दिवस म्हणजे ममता दिन

 आम्हा तमाम शिवसैनिकांच्या माऊली, वात्सल्यमूर्ती माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏  माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जयंती दिवस म्हणजे  ममता दिन  शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या परिवाराला आईच्या मायेने, वात्सल्याने  सांभाळणाऱ्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जन्म ६ जानेवारी  १९३२ रोजी झाला. मीनाताईचे पूर्वाश्रमीचे नाव सरला वैद्य असे होते. १३  जून  १९४८ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी विवाह झाल्यानंतर मीना ठाकरे असे नाव बदलण्यात आले. मीनाताईची माया साऱ्या घराला व्यापून उरलेली असे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवसेनेचा झेंडा रोवला गेला. संघटनेच्या स्थापनेनंतर काही दिवसातच बाळासाहेबांनी रायगडाला जाऊन महाराजांच्या समाधीला वंदन केलं, त्यांच्याबरोबर मीनाताई आणि भगिनी सुशीलाताई गुप्ते उपस्थित होत्या. शिवसेना महिला आघाडीच्या महिला शाखेच्या स्थापनेसाठी त्यांनी कार्य केले. सीमा प्रश्नसंदर्भात महाराष्ट्रात जे आंदोलन भडकले त्यामुळे बाळासाहेबांना अटक करून येरवडा मध्यवर्ती पाठविण्यात आले. बाळासाहेब तुरुंगातून आपल्या...
 *विठु माझा लेकुरवाळा II संगे गोपाळांचा मेळा II*     हा प्रसिद्ध अभंग लिहिणाऱ्या संत जनाबाई यांची आज पुण्यतिथी.  विनम्र अभिवादन🙏🙏 *नामयाची दासी* म्हणून घेण्यात धन्यता मानणाऱ्या संत जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला . त्यांच्या वडिलांनी जनाबाईंना दामा शेठ शिंपी यांच्या पदरात टाकले तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या.   नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला *दळीता कांडिता तुज गाईन अनंता* असे त्या म्हणत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव- विसोबा खेचर - संत नामदेव - संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत नामदेवांविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. *परलोकीचे तारूI म्हणे माझा ज्ञानेश्वरूII* असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे. संत जनाबाईच्या नावावर असलेले सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहे. पांडुरंगाच्या गळ्यातील सोन्याचे पदक चोरल्याचा आरोप त्यांच्यावर घेण्यात आला त्यावेळी जनाबाईंनी मी सोन्...

संक्रांत साजरा करू असा..... सकारात्मकतेचा लुटू वसा

  🪁🪁🪁 *सिद्ध साहित्यिका समूह आयोजित भव्यदिव्य लेख लेखनस्पर्धा*🪁🪁🪁 विषय --- *संक्रांत साजरा करू असा..... सकारात्मकतेचा लुटू वसा*          *तिळगुळ घ्या आणि पाठीमागे तरी गोड बोला* कारण  तोंडावर तर सगळेच गोड बोलतात. हा मेसेज वाचला आणि मन विचारचक्रात गुंतून गेले. बदलत्या काळानुसार जशा परंपरा बदलल्या तसाच त्या परंपरेच्या अनुषंगाने असलेल्या वचनांचा ही संदर्भ बदलला हेच यातून लक्षात येते. संक्रांत म्हणजे संक्रमणाचा काळ. पौष महिन्यात येणारा शेतीशी निगडीत असा सण.       तीन दिवसाच्या या सणाचा पहिला दिवस म्हणजे *भोगी*  शेतात उगवलेल्या ताज्या भाज्यांची  केलेली लेकुरवाळी किंवा खेंगट भाजी हा या दिवशीचा विशेष खाद्यपदार्थ. बदलत्या जीवन पद्धतीनुसार, कार्यपद्धतीनुसार प्रत्येकाच्याच वैयक्तिक तसेच कौटुंबिक आयुष्यामध्ये भावनांची सरमिसळ झालेली आपण पाहतो. परंतु एखाद्या विशिष्ट भावनेचा (उदा. राग, तिरस्कार, संशय, हव्यास) अतिरेक झाला तर कुटुंब उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतात मला वाटते ही जी भाजी असते ती आपल्याला विविध भाज्यांची सरमिसळ योग्य प्रमाणा...

वर्षपूर्ती विश्वासाची आणि वचनबद्धतेची

 🚩 *वर्षपूर्ती विश्वासाची आणि वचनबद्धतेची* 🚩    जनता पहाटेच्या साखर झोपेत असताना शपथविधीचा सावळा गोंधळ घालणाऱ्या आणि वर्षभर मंत्रालयाच्या पायरीवर उभे राहून सरकार पाडण्याची दिवास्वप्न पाहणाऱ्या विरोधकांना महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती ने सणसणीत चपराक दिली आहे.     छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात परकीयांपेक्षा स्वकीयांनीच सर्वाधिक मोडते घालण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र मध्ये शिवशाहीचे सरकार स्थापन झालेले असताना विरोधक वर्षभर तोच मोडता घालण्याचा कार्यक्रम अयशस्वीपणे राबवताना दिसत आहे.     मराठीमधील एक म्हण या विरोधी पक्षाला अगदी चपखलपणे शोभून दिसते. *कोणी निंदा कोणी वंदा आमचा सरकार पाडण्याचा धंदा* आणि पुढील काळातही त्यांना हेच काम राहणार आहे. कारण महाविकास आघाडीच्या या तीन पक्षांच्या एकत्र येण्याने स्थापन झालेले *ठाकरे सरकार* हे मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या संयमी, नीतीपूर्ण आणि संस्कारी नेतृत्वाने महाराष्ट्र राज्यावर आलेल्या अस्मानी संकटांना यशस्वीपणे लढा देत आपली वर्षपूर्ती ची आणि पुढील काळा...

तोकड्या तलवारीची लढाई

 *तोकड्या तलवारीची लढाई* हे रोखठोक वाचले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती चे अभिनंदन. हे वर्ष अनेक अस्मानी संकटांना लढा देत  तसेच विरोधकांच्या सरकार पाडण्याच्या नाट्याचे अनेक प्रयोग होत असताना ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी, नीतीपूर्ण आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याच्या संस्कारांनी आपली यशस्वी घोडदळ करत आहे. कथेतील सेनापतीने सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेबांनी विश्वासाचे आणि संयमाचे एक पाऊल पुढे टाकून घ्या तोकड्या तलवारीने रणांगण जिंकून घेतले आहे. पहाटेच्या साखरझोपेत झालेला शपथविधी आणि सरकार पाडण्याची दिवास्वप्न पाहणारा विरोधक यांनी आतातरी जागे होऊन आपली विरोधी पक्षाची भूमिका महाराष्ट्राच्या  राजकारणाला शोभेल अशा पद्धतीने पार पाडली पाहिजे. सरकार किती जणांचे आहे यापेक्षाही महत्त्वाचे ते किती विश्वासानी जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.

स्वातंत्र्याची ऐसी तैसी

 *स्वातंत्र्याची ऐसी तैसी* *स्वातंत्र्या तुझी व्याख्या काय?* हे 'रोखठोक' वाचताना जे भारतीय संविधान न्याय, स्वातंत्र्य आणि समता या भक्कम पायावर उभे राहिले आहे त्याचीच केंद्रीय सत्तेकडून पायमल्ली होत असल्याचे दिसून येते.     सत्तेचा उपभोग हा केवळ वैयक्तिक हितासाठी घेण्याची वृत्ती बळावताना दिसत आहे. भाट आणि हुजरेगिरी करणाऱ्यांनाच सत्तेची मलई चाखायला मिळण्याची हल्लीची काही प्रकरणे पाहिली असता याच साठी का सामान्य जनतेने कमळ फुलवले हा प्रश्न पडतो?    नैराश्य आणि कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या करणारा नट, आपल्या बेताल बोलण्याने मुख्यमंत्र्यांना अरे तुरे  आणि शेतकरी आंदोलकांना भाडोत्री म्हणणारी नटी, लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा आक्रस्ताळी पत्रकार, अमली पदार्थांचा साठा करणारी विनोदी नटी यांच्यासाठीच केवळ केंद्रीय सत्ता, सर्वोच्च न्यायालय आहे का? दिल्लीच्या सीमेवर थंडीमध्ये न्याय्य हक्कांसाठी लढणारा शेतकरी हा या न्यायव्यवस्थेचा आणि सत्तेचा कोणीच नाही का यासारखे प्रश्न उभे राहतात.      स्वैराचार, स्वार्थ, सामाजिक अहित यांना कायदेशीर बंधने घालून स्वातंत्र्याचा ...

पुस्तक घडवते मस्तक

Image
लेखक प्रा. #विद्या_संतोष_होडे हडपसर विधानसभा समन्वयक vidyahode.blogspot.com एम ए एम एड, डीएसएम, बॅचलर इन जर्नालिझम You tube https://www.youtube.com/channel/UC-ivpBD8NUBpx5HDv3_v4eg डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिवस #वाचन_प्रेरणा_दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीमध्ये वाचाल तर वाचाल ही म्हण आहे.  वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयुष्यात प्रेरणा देणारे, चांगले विचार देणारे आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मूलमंत्र देणारे असे एक प्रेरणादायी पुस्तक वाचनात आले. #यशाचा_Password   --  प्रा. नितीन बानगुडे-पाटील. मुद्रा प्रकाशन सातारा. प्रथमावृत्ती २० नोव्हेंबर २०१७ द्वितीय आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१८ पृष्ठे २२८ मूल्य २५० /- ______________________________________________ साप्ताहिक चित्रलेखामध्ये 2013 ला तरुणांना मार्गदर्शन आणि यशप्राप्तीसाठी दिशा देण्यासाठी प्रा नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह *यशाचा पासवर्ड* या पुस्तकात करण्यात आले आहे.     यश मिळविण्यापेक्षा यशाचा मार्ग दाखविणे, सांगणे कठीण कर्म आ...

अटलजींची कविता आणि सकारात्मक दृष्टीकोण

Image
  अटलजींची कविता आणि सकारात्मक दृष्टीकोण                अटलजी हे प्रभावशाली वक्ता आणि भावनाशील कवी म्हणून आपल्याला परिचित आहेत. त्यांचे कवी मन त्यांच्या वाणीतून प्रसंगी कठोर आणि प्रसंगी हळवे झाले. त्यांच्या कवितेने जीवनाविषयक सकारात्मकता, कठीणातील कठीण प्रसंगाला ध्यैर्याने सामोरे जाण्याची जिद्द, प्रेम, मृत्यूची आढळताआणि जगण्याची ओढ अशा अनेक विषयांना हात घातला.               आयुष्यात अडचणी, संकटे येतच असतात पण सदैव चालत राहणे हा मनुष्यधर्म ते सांगतात.          " बाधाये आती है और आये            घिरे प्रलय कि घोर घटाये             पावो के नीचे अंगारे            सिर पर बरसे यदि ज्वालाये            निज हाथो मे हसते-हसते           आग लागाकर जलना  होगा            कदम मिलाकर चालना होगा I       ...

3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

Image
 🌹 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती : सावित्रीच्या लेकी असे म्हणून घेताना अभिमानाने मान ताठ होते. तसं पाहिलं तर भारत जगतात दोन सावित्री ने आपल्या कर्तुत्वाने जगासमोर आदर्श ठेवला. एक सत्यवानाची सावित्री आणि दुसरी ज्योतिबाची सावित्री. एकीने यमाकडून पतीचे प्राण परत आणले आणि दुसरीने पतीच्या साथीने जगातील स्त्रियांच्या जगण्यात प्राण ओतला. आजच्या स्त्रीचा विचार केला तर या दोन्ही सावित्रीचा मिलाप होणे फार गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार शालेय जीवनात महत्त्वपूर्ण दहा गाभा घटक शिकवले जातात त्यातील एक "स्त्री पुरुष समानता" आहे. आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या जमान्यामध्ये स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभे आहे स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा मागे नाही स्त्रीही कर्तुत्ववान कर्तबगार आहे हे सिद्ध केले मग असं असतानाही, स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढताना दिसते , स्त्री शिक्षणाबाबत आजही उदासीनता जाणवते,  मुलगी म्हणजे परक्याचे धन हे वयात आलेल्या प्रत्येक मुलीच्या आई बापाला वाटते , मुलगी म्हणजे काचेचं भांडं असं प्रत्येक तरुण मुलीच्या ...

हमारी राष्ट्रीय प्रतिज्ञा के लेखक थे कवि ‘पेदेमरी व्यंकट सुब्बाराव’

Image
 भारत एक बहुभाषी, बहुसांस्कृतिक देश है, लेकिन इस विविधता में भी एकता है। भारत की राष्ट्रीय प्रतिज्ञा, राष्ट्रगान, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय त्यौहार एकता की अभिव्यक्ति हैं।  हम सभी स्कूली जीवन से ही पाठ्यपुस्तक की शुरुआत में राष्ट्रीय प्रतिज्ञा कहते आ रहे हैं। भारत मेरा देश है। सभी भारतीय मेरे भाई हैं। मुझे अपने देश से प्यार है। यह प्रतिज्ञा हमारी पहचान और एकता का एक अभिन्न अंग है। हम राष्ट्रगान ‘वंदे मातरम्’ के लेखक और राष्ट्रगान ‘जन गण मन’ के लेखक रवींद्रनाथ टैगोर, बंकिमचंद्र चटर्जी के नामों से परिचित हैं। पाठ्यपुस्तकों में भी इन्हीं नामों का उल्लेख है, लेकिन हममें से अधिकांश को इस बात का कोई अंदाजा नहीं है कि हमारी राष्ट्रीय प्रतिज्ञा किसने लिखी और कब इसे पाठ्यपुस्तकों में शामिल  किया गया?  हमारी राष्ट्रीय प्रतिज्ञा से तर्कसंगत, समतावादी, एकीकृत समाज के निर्माण का आदर्श विचार रखा गया है। हम आने वाली पीढ़ियों के लिए इस अनमोल धरोहर को संरक्षित करना जारी रखेंगे। आओ जानते हैं इस प्रतिज्ञा लेखक के बारे में... यह प्रतिज्ञा 1962 में आंध्र प्रदेश के प्रसिद्ध तेलुगु लेखक पेद...

मातृदिन

 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 *प्रा. सौ #विद्या_संतोष_होडे   *आई......*             *जन पळभर म्हणतिल 'हाय हाय' मी जाता राहील कार्य काय....* या भा रा तांबे यांच्या ओळींनी मरणाची भीती कधीही मनाला शिवून न देणारी माझी आई.....          मी आहे तोपर्यंत काही काळजी करू नका आणि मेल्यानंतरही तुम्हाला काळजी करावी लागणार नाही असे आयुष्यभर सांगणारी माझी आई....         आई  तुला जाऊन एक वर्ष झाले पण हे वर्ष युगासमान वाटले गं.......  'आई मुलांसाठी काय करते' असे रागाने म्हणणारे आम्ही पण खरंच जाणवतं आई मुलांसाठी काय करते अन् किती करते हे तुझ्याकडे पाहून कळते. एक मराठीची शिक्षिका म्हणून तुझ्यातील हुशारी, अभ्यासूवृत्ती, चुणूक ही नेहमीच तू आयुष्य कसं जगावं? आर्थिक नियोजन कसं करावं? हे फार मोठं अवडंबर न माजवता लहान लहान म्हणी, शब्दप्रयोग यातून आम्हाला समजून सांगितले. *लंकेत सोन्याच्या विटा* *थेंबे थेंबे तळे साचे*          लहानपणी जेव्हा ७० टक्के पडले की तू म्हणायचीस बघ तुझ्या...

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?

 #लेख विषय: #तुझ्या_विना_जाऊ_शरण_कुणा_? लेखिका: #प्रा_विद्या_संतोष_होडे महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी #आषाढी__एकादशी  निमित्त अठ्ठावीस युगे कर कटावरी ठेवून उभ्या असणाऱ्या विठुरायाकडे विठूमाऊली कडे महाराष्ट्राच्या कल्याणाचे साकडे घातले. मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी लढवय्या सेनापतीच्या भूमिकेतून कोरोनारुपी संकटामध्ये महाराष्ट्राचे खंबीरपणे नेतृत्व केले आहे ते पाहता आज विठुरायाच्या दर्शनाने त्यांच्या मनी #भाग_गेला_शीण_गेला । #अवघा_झाला_आनंद  हे भाव आले असणार हे नक्कीच. #शुद्ध_बीजापोटी_फळे_रसाळ_गोमटी या प्रमाणे प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीचा, कार्यकर्तृत्वाचा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचा वारसा मा.उद्धव साहेब ठाकरे यांनी  आपल्या खंबीर, संयमी आणि शांत स्वभावाने सिद्ध करून दाखवला आहे. #आपण_चंदन_असल्याची_घोषणा_चंदनाला_करावी_लागत_नाही_त्याचा_वास_वाऱ्याबरोबर_आसमंतात_पसरत_असतो महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून  मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची, मुख्यमंत्...

कोरोना शाप की वरदान

 लेख  विषय: कोरोना शाप की वरदान  लेखिका: प्रा विद्या संतोष होडे शालेय जीवनापासून एक निबंध हमखास लिहायला असायचा *विज्ञान शाप की वरदान*  मग एका विषयाच्या दोन्ही बाजू मांडत असताना विज्ञान मानवाला वरदान कसे ठरले आहे आणि विज्ञानाचा मानवाने केलेला अतिरेक त्यालाच शाप कसा देत आहे या दोन्ही बाजू मांडल्या जायच्या.  काळाच्या ओघात विज्ञानामध्ये नवनवीन टप्पे येत गेले बदल घडत गेले आधुनिक तंत्रज्ञान आले आणि आजच्या या २०२० मध्ये ज्यावेळेस भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे, तरुणांचा देश म्हणून प्रगतीपथावर जात आहे त्याच वेळेस एक असा विषय समोर आला की ज्यांनी  मानवाच्या प्रगतीची, मानवाच्या उत्तुंग भरारीची, मानवाने विज्ञानाच्या साथीने निसर्गावर केलेल्या आक्रमणाची सर्व पंख छाटून टाकली आणि तो विषय या पुढील काळामध्ये निबंधाचा विषय ठरला नाही तर नवलच आहे. तो विषय आहे *कोरोना शाप की वरदान* *कोरोना शाप की वरदान* या विषयाचा विचार करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने डोळ्यासमोर येते ती म्हणजे कोविड १९ या अदृश्य अतिसूक्ष्म विषाणूने मानवाला घरांमध्ये बंदिस्त करून ठेवले आणि विशे...

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर...

 अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर...  आधी हाताले चटके मग मिळते भाकर........        या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळी  जीवनाचा खरा अर्थ सांगून जातात.     आज लॉकडाऊन स्पेशल मध्ये चुलीवर स्वयंपाक करताना मला सतत या ओळी आठवत होत्या.    आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कधीही न येऊ असा निवांतपणा लॉकडाऊन मुळे मिळाला. लहानपणी गावाकडे अनुभवलेली चुलीवरच्या जेवणाची चव खूप वर्षांनी अनुभवता आली.     चुलीवरचे गरमागरम जेवण म्हणजे नक्की काय?  तर संपूर्ण आयुष्याचा सार आहे.     चुलीमध्ये सतत लाकडे टाकून चूल पेटवावी लागते. सगळीच लाकडे मोठी घालून चालत नाही काही छोट्या-छोट्या काटक्या, पालापाचोळा, एखादे मोठा लाकूड अशी त्या सरपणा मध्ये विविधता असेल तरच चूल चांगली पेटते. आपल्या आयुष्यातही असंच आहे ना! नेहमीच स्वतःच खरे म्हणून कसं चालेल कधीतरी कमीपणा घ्यावा लागतो, कधी माघार घ्यावी लागते, तर कधी सरशी घेऊन पुढे व्हावंच लागत.       चुलीवर स्वयंपाक करताना भांड्याचं बूड हे नेहमी जाडच असावं लागतं.     तसंच आपल्...

मन करा रे प्रसन्न

Image
  लेख: मन करा रे प्रसन्न 10 ऑक्टोबर #जागतिक_मानसिक_आरोग्य_दिन   आरोग्य ही बहुआयामी संकल्पना आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. प्राचीन काळापासून *शरीर खलु धर्म साधनम्* *आरोग्यम् धनसंपदा* यांसारख्या सुभाषितांद्वारे आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. षडरिपूवर नियंत्रण प्राप्त झाले की सुखी जीवन जगता येते. केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे म्हणजे उत्तम आरोग्य नाही तर मानसिक दृष्ट्या संतुलित, नियंत्रित असणे याला आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. या * मना * ला अनुसरूनच मराठी भाषेमध्ये अनेक म्हणी आहेत.  *मन चिंती ते वैरी न चिंती* *मन मोकळे करणे*  *मनास लावून घेणे* *चोराच्या मनात चांदणे* *मनी वसे ते चित्ती दिसे* *मन भरून येणे* *मनात मांडे खाणे* *मनात घर करणे*      व्यक्तिमत्त्वाचा समतोल व एकात्म विकास साधणे, आपल्याजवळील समायोजनक्षमतेव्दारे जीवन अधिकाधिक कार्यक्षम करणे, मन निरोगी व विकसनशील ठेवणे या सर्व बाबी मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत. *Mental hygiene is a science and art of av...