तोकड्या तलवारीची लढाई
*तोकड्या तलवारीची लढाई* हे रोखठोक वाचले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती चे अभिनंदन. हे वर्ष अनेक अस्मानी संकटांना लढा देत तसेच विरोधकांच्या सरकार पाडण्याच्या नाट्याचे अनेक प्रयोग होत असताना ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी, नीतीपूर्ण आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याच्या संस्कारांनी आपली यशस्वी घोडदळ करत आहे. कथेतील सेनापतीने सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेबांनी विश्वासाचे आणि संयमाचे एक पाऊल पुढे टाकून घ्या तोकड्या तलवारीने रणांगण जिंकून घेतले आहे.
पहाटेच्या साखरझोपेत झालेला शपथविधी आणि सरकार पाडण्याची दिवास्वप्न पाहणारा विरोधक यांनी आतातरी जागे होऊन आपली विरोधी पक्षाची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभेल अशा पद्धतीने पार पाडली पाहिजे. सरकार किती जणांचे आहे यापेक्षाही महत्त्वाचे ते किती विश्वासानी जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Comments
Post a Comment