Know your Army Mela 2025
सदैव सैनिका पुढेच जायचे!
सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे
नभात सैनिका प्रभात येऊ दे
खगासवे जगा सुखात गाऊ दे
फुलाफुलावरी सैनिका सुवर्ण शोभू दे
जगास शांतता सुहास्य लाभू दे
न पाय तोवरी तुझे ठरायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे
वसंत बापट यांची ही कविता सैनिकाचे जीवन व ध्येय किती खडतर आहे यावर भाष्य करणारी आहे.
आज know Your Army Mela या प्रदर्शनास भेट देत असताना सातत्याने या कवितेच्या ओळी मनामध्ये रेंगाळत होत्या.
एखाद्या नृत्याच्या निमित्ताने मिलिटरी चा ड्रेस परिधान करणे ही उत्सुकता आपल्यालाही लहानपणी होती, तीच उत्सुकता आजच्या मुलांमध्येही आहे.
आपण सुखी आनंदी सुरक्षित जीवन जगतो त्याला कारण सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करण्यासाठी हे सैनिक सज्ज असतात.
मुलांबरोबर हे प्रदर्शन पाहत असताना त्यांनीही मोठ्या उत्सुकतेने प्रदर्शनात ठेवलेल्या अत्याधुनिक शस्त्रांची तंत्रांची माहिती घेतली.
Comments
Post a Comment