मी आणि मेकअप !!!!!

 मी आणि मेकअप !!!!!


दूरदर्शन वरळी येथील मेकअप स्टुडिओमध्ये मोठ्या आरशासमोर बसून मेकअप करत असताना अनेक आठवणी तरळून गेल्या. मेकअपचा आणि माझा तसा फार दूर दूर चा संबंध...…. 


 शाळेतील शेतकरी नृत्य, दांडिया तसेच बीएड कॉलेज मधील तुला शिकवीन चांगलाच धडा हे सादरीकरण याप्रसंगी मेकअप केला. ती त्या व्यासपीठाची गरज होती. 


पण तसा दैनंदिन जीवनात मी फारसा काही मेकअप करत नाही. त्यामुळे वरळी दूरदर्शनच्या मेकअप स्टुडिओमध्ये जिथे अनेक कलाकार, थोर व्यक्ती यांचा मेकअप होताना आपण टीव्ही मध्ये पाहत असतो, त्या ठिकाणी मेकअप आर्टिस्ट चेहऱ्याला मेकअप करत होते. त्यांने मला फार आनंद झाला.


 यावेळी आई असती तर ती खूपच खुश झाली असती. कारण तिच्याप्रमाणेच मी ही नेहमी केसांची वेणी, टापटीप साडी अशा साधी राहणी पोशाखात वावरणारी . 


पण आज स्टुडिओत सादरीकरणासाठी मेकअप करणे गरजेचे होते.


यावर माझ्या सासूबाईंची प्रतिक्रिया 

विद्या तू खूप छान दिसत होतीस!!!! या वाक्याने मी खूप भरून पावले.

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?