क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏


पुराणातील सत्यवानाचा प्राण वाचवणारी सावित्री आणि शिक्षणाची ज्योती घराघरांमध्ये पोहोचवणारी ज्ञानज्योती जोतिबाची सावित्री या दोघींनी महिलांना संस्कार आणि शिक्षणाचा आदर्श घालून दिला. 


डोईवरचा पदर आणि कपाळावरची चिरा संस्काराबरोबरच पतीच्या शैक्षणिक सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणा-या सावित्रीबाईंनी प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचे द्वार खुले करून दिले. 


या विषयावरच आधारित एक कविता


तुझी सावित्री अन् माझी सावित्री


सखे आपण दोघीही 

सावित्रीला आईच मानतो ......

पण फारच वेगळी आहे 

तुझी सावित्री अन् माझी सावित्री 


तुझी सावित्री म्हणे ....

स्वर्गापर्यंत धावली पतीच्या प्राणासाठी 

माझ्या सावित्रीने धरतीवरच स्वर्ग उभा केला स्त्री शिक्षणासाठी .......


तुझी सावित्री पूजापाठ, आचार विचार 

अन् सात जन्माची महती सांगणारी......

माझी सावित्री सन्मानासाठी दगड धोंडे आणि शेणाचा मारा अंगावर झेलणारी........


तुझी सावित्री धर्मग्रंथात

अन् भाकड कथात रमणारी....

माझी सावित्री अंधश्रद्धा, रूढी परंपराना छेद देऊन समाजाशी लढणारी...


 सखे तुझी सावित्री वाचली तर वडाचे झाड आणि सत्यवान कळणार ........

माझी सावित्री वाचली तर तुला स्त्रीमुक्तीचे द्वार दिसणार.......

.................#####............. ####........


आजच्या काळात संस्कार, संस्कृती आणि शिक्षण यांचा योग्य मेळ घालणारी आधुनिक युगातील सावी, साऊ ( जुनी नावे नवा साज )आपल्याला घडवायची आहे.

त्यामुळे वडाच्या फेऱ्या मारणाऱ्या साऊला धर्म संस्काराबरोबरच आकाशाला गवसणी घालणारे तंत्रज्ञान ही अवगत झाले पाहिजे असे मला वाटते.

Comments

Popular posts from this blog

प्रा. विद्या संतोष होडे

सावी

तुझ्या विना जाऊ शरण कुणा ?