करील मनोरंजन जो मुलांचे!! जडेल नाते प्रभूशी तयाचे!! काल महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली. शालेय व्यवस्थापन समितीची स्थानिक शिक्षण तज्ञ व एक पालक म्हणून या शाळेशी जोडले गेल्याचा अभिमान वाटतो. मागे सोशल मीडियावर शाळेतील विद्यार्थिनींने एका हिंदी गाण्यावर नृत्य केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. आणि खरंच शाळेमध्ये गॅदरिंग असावे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला होता. पण काल या शाळेच्या गॅदरिंगला गेले असता छत्रपती शिवाजी महाराज, साने गुरुजी, भारतीय सैन्य, पंढरीची वारी, पोलीस बांधव , आई-वडिलांबद्दल आदर, स्त्री शिक्षण, समाजसुधारकांचे कार्य, क्रांतिकारकांचे कार्य, पर्यावरण संवर्धन या विविध विषयांवर नृत्य सादरीकरण करून समाजप्रबोधनाचा आदर्श घालण्याचे काम शाळा आणि विद्यार्थी या दोघांकडून होत असल्याचे लक्षात आले. त्यांच्या कलागुणांना कौशल्य विकासाला वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन सहल सहशालेय...