वर्षपूर्ती विश्वासाची आणि वचनबद्धतेची
🚩 *वर्षपूर्ती विश्वासाची आणि वचनबद्धतेची* 🚩 जनता पहाटेच्या साखर झोपेत असताना शपथविधीचा सावळा गोंधळ घालणाऱ्या आणि वर्षभर मंत्रालयाच्या पायरीवर उभे राहून सरकार पाडण्याची दिवास्वप्न पाहणाऱ्या विरोधकांना महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती ने सणसणीत चपराक दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात परकीयांपेक्षा स्वकीयांनीच सर्वाधिक मोडते घालण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र मध्ये शिवशाहीचे सरकार स्थापन झालेले असताना विरोधक वर्षभर तोच मोडता घालण्याचा कार्यक्रम अयशस्वीपणे राबवताना दिसत आहे. मराठीमधील एक म्हण या विरोधी पक्षाला अगदी चपखलपणे शोभून दिसते. *कोणी निंदा कोणी वंदा आमचा सरकार पाडण्याचा धंदा* आणि पुढील काळातही त्यांना हेच काम राहणार आहे. कारण महाविकास आघाडीच्या या तीन पक्षांच्या एकत्र येण्याने स्थापन झालेले *ठाकरे सरकार* हे मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या संयमी, नीतीपूर्ण आणि संस्कारी नेतृत्वाने महाराष्ट्र राज्यावर आलेल्या अस्मानी संकटांना यशस्वीपणे लढा देत आपली वर्षपूर्ती ची आणि पुढील काळा...