*विठु माझा लेकुरवाळा II संगे गोपाळांचा मेळा II* हा प्रसिद्ध अभंग लिहिणाऱ्या संत जनाबाई यांची आज पुण्यतिथी. विनम्र अभिवादन🙏🙏 *नामयाची दासी* म्हणून घेण्यात धन्यता मानणाऱ्या संत जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला . त्यांच्या वडिलांनी जनाबाईंना दामा शेठ शिंपी यांच्या पदरात टाकले तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला *दळीता कांडिता तुज गाईन अनंता* असे त्या म्हणत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव- विसोबा खेचर - संत नामदेव - संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत नामदेवांविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. *परलोकीचे तारूI म्हणे माझा ज्ञानेश्वरूII* असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे. संत जनाबाईच्या नावावर असलेले सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहे. पांडुरंगाच्या गळ्यातील सोन्याचे पदक चोरल्याचा आरोप त्यांच्यावर घेण्यात आला त्यावेळी जनाबाईंनी मी सोन्...
Posts
Showing posts from August, 2023