संक्रांत साजरा करू असा..... सकारात्मकतेचा लुटू वसा
🪁🪁🪁 *सिद्ध साहित्यिका समूह आयोजित भव्यदिव्य लेख लेखनस्पर्धा*🪁🪁🪁 विषय --- *संक्रांत साजरा करू असा..... सकारात्मकतेचा लुटू वसा* *तिळगुळ घ्या आणि पाठीमागे तरी गोड बोला* कारण तोंडावर तर सगळेच गोड बोलतात. हा मेसेज वाचला आणि मन विचारचक्रात गुंतून गेले. बदलत्या काळानुसार जशा परंपरा बदलल्या तसाच त्या परंपरेच्या अनुषंगाने असलेल्या वचनांचा ही संदर्भ बदलला हेच यातून लक्षात येते. संक्रांत म्हणजे संक्रमणाचा काळ. पौष महिन्यात येणारा शेतीशी निगडीत असा सण. तीन दिवसाच्या या सणाचा पहिला दिवस म्हणजे *भोगी* शेतात उगवलेल्या ताज्या भाज्यांची केलेली लेकुरवाळी किंवा खेंगट भाजी हा या दिवशीचा विशेष खाद्यपदार्थ. बदलत्या जीवन पद्धतीनुसार, कार्यपद्धतीनुसार प्रत्येकाच्याच वैयक्तिक तसेच कौटुंबिक आयुष्यामध्ये भावनांची सरमिसळ झालेली आपण पाहतो. परंतु एखाद्या विशिष्ट भावनेचा (उदा. राग, तिरस्कार, संशय, हव्यास) अतिरेक झाला तर कुटुंब उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतात मला वाटते ही जी भाजी असते ती आपल्याला विविध भाज्यांची सरमिसळ योग्य प्रमाणा...